लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इंग्रजी माध्यमातील शिक्षण देण्यासाठी पायाभूत सुविधा नसतानाही ग्रामीण भागात कॉन्व्हेंटची संख्या वाढू लागली. पालकांच्या दृष्टीने एक सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले. पण दुसरीकडे काही संस्थानी आवश्यकता नाही अशा गावांमध्येही कॉन्व्हेंट सुरू केल्या आहेत.सध्या मोठ्या प्रमाणात कॉन्व्हेंट सुरू करण्यात आल्याने आता शिक्षण महागले आहे. यापैकी किती कॉन्व्हेंटना मान्यता आहे, याची देखील पालकांना कल्पना नाही. त्यामुळे अनधिकृतपणे सुरू केल्या जाणाऱ्या कॉन्व्हेंटवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.अडीच ते पाच वर्षे वय असणाºया बालकांना कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश दिला जातो. निटनेटका ड्रेस, टाय, बेल्ट आयकार्ड, पाठीवर दप्तर, टिफीन, वॉटरबॅग आदी साहित्यांनी सजलेला आपला पाल्य बघून पालकांना आनंद वाटणे स्वाभाविक आहे. मुलगा अथवा मुलगी कॉन्व्हेंटमध्ये जातात. चांगल्या गोष्टी शिकतात. उत्तम सवयी लागतात. कविता म्हणून दाखवितात. या बाबी सत्य असल्या तरी सर्वच कॉन्व्हेंटमध्ये असे घडत नाही. बालकांच्या मानसिकतेनुसार अध्यापन पद्धतीचा अवलंब केला जातो का, या गोष्टींकडे संस्थाचालकांचे लक्ष नसते.गुणात्मक प्रगतीवर संख्यात्मक प्रगती वरचढ झाल्यामुळे शिक्षण पद्धतीतील आनंद पार विरून गेला आहे. त्याची जागा घोकमपट्टीने घेतल्याची नाराजी काही जागरूक पालक व्यक्त करीत आहेत. कॉन्व्हेंटमध्ये अध्यापन करणारे किती शिक्षक प्रशिक्षित असतात. त्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती कोणत्या, हे संस्थेकडून कधीही पुढे येऊ दिल्या जात नाही.ज्या कोवळ्या वयात बालकांच्या मनाला वळण द्यायचे असते ते काम तज्ज्ञ शिक्षकांकडून होणे अपेक्षित असते. परंतु बºयाच ठिकाणी तसे होताना दिसत नाही. आपली कोवळी फुले कोमेजून तर जाणार नाही, याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे. शहर ते गावापर्यंत रस्त्याच्या आजूबाजूला अनेक कॉन्व्हेंटचे फलक लागले दिसतात. विविध सुविधांचे त्यामध्ये प्रदर्शनदेखील केलेले असते. प्रत्यक्षात किती कॉन्व्हेंटमध्ये तशा सुविधा उपलब्ध असतात, हे सांगणे मात्र कठीण आहे. पालक चमक- धमक बघून कॉन्व्हेंटमध्ये टाकतात. हीच बाब हेरुन ग्रामीण भागात कॉन्व्हेंट वाढू लागल्या आहेत.श्रीमंत मंडळी करीत आहेत गुंतवणूकशहरात स्थानिक व्यक्ती किंवा परिसरातील व्यक्तीकडून कॉन्व्हेंट, शाळा, महाविद्यालय सुरू केल्या जात होते. मात्र पालकांचे शिक्षणाप्रती वाढलेले आकर्षण व मुलांच्या शिक्षणासाठी जमेल तेवढे पैसे खर्च करण्याची कमजोरी बघून आता मोठे ग्रुपही हातपाय पसरत आहेत. जिल्ह्यात सध्या आर्थिकदृष्ट्या शक्तीवान मंडळी फ्रेंचायसीवर कॉन्व्हेंट सुरू करीत आहेत. दरवर्षी नव्या कॉन्व्हेंटची भर पडत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.
ग्रामीण भागातही कॉन्व्हेट शाळांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:15 PM
इंग्रजी माध्यमातील शिक्षण देण्यासाठी पायाभूत सुविधा नसतानाही ग्रामीण भागात कॉन्व्हेंटची संख्या वाढू लागली. पालकांच्या दृष्टीने एक सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले. पण दुसरीकडे काही संस्थानी आवश्यकता नाही अशा गावांमध्येही कॉन्व्हेंट सुरू केल्या आहेत.
ठळक मुद्देपायाभूत सुविधाच नाही : गुणात्मक प्रगतीकडे संस्थाचालकांचे दुर्लक्ष