यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, डॉ. सुधीर मेश्राम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्रांची संख्याही अधिक वाढविण्यात यावी. कोरोना रुग्णांवर उपचार करताना इतर व्याधिग्रस्त रुग्णांकडेही दुर्लक्ष होऊ देऊ नये, असेही त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडविणे व रुग्णालयाची नियमित साफसफाई व्हावी, आदी सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या. उपलब्ध औषधसाठा, मनुष्यबळाची उपलब्धता, व्हेंटिलेटर बेड, आयसीयू व रिक्त बेडसंख्या, तसेच लसीकरणाचाही आढावा घेण्यात आला.
बॉक्स
नागरिकांना मिळणार सहजपणे माहिती
जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांची माहिती व सेवांचा लाभ घेण्यासाठी चंद्रपूर ऑक्सिजन संकेतस्थळाचा शुभारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, चंद्रपूर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली अँड्रॉइड स्टुडिओ व ओपन सोर्स फ्लटर फ्रेम वापरून हे अप्लिकेशन विकसित केले. अॅपमध्ये कोविड-१९ बाबत सर्व माहिती, प्रशासनाचे आदेश, रेशन कार्ड सुविधा, ताडोबा पर्यटन ऑनलाइन बुकिंग व जिल्हा कार्यालयांच्या वेबसाइट लिंक अॅपमध्ये दिल्या आहेत.