विजय मार्कंडेवार : शेतकऱ्यांच्या व्यथा साहित्यिकांनी प्रभावीपणे मांडल्या पाहिजेचंद्रपूर : नक्षत्राचं देणं काव्यमंच पूणे आणि झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय काव्यस्पर्धा आणि वार्षिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ऊर्जानगर श्री गुरुदेव सेवा मंडळ प्रार्थना सभागृहात झालेल्या या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ व लेखक विजय मार्कंडेवार यांच्या हस्ते झाले. शाखाध्यक्ष भाऊराव बावणे, प्राचार्य डॉ. अनिल मुसळे, सेवाधिकारी शंकर दरेकर, झाडीबोली मंडळाचे सचिव प्रा. डॉ. राज मुसने, स्पर्धा संयोजक शिवशंकर घुगुल, देवराव कोंडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. निसर्ग आणि शेतकरी या विषयांवर कविता पत्राद्वारे बोलविण्यात आल्या होत्या. एकूण आठ जिल्ह्यातून ४२ कवींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. काव्यस्पर्धेचे प्रथम बक्षीस गजानन ताजणे, हिवरा मराज यांना द्वितीय क्रमांक महादेव हुलके खैराव, तृतीय बक्षिस संगीता घोडेस्वार यांना प्राप्त झाले. तर प्रोत्साहनपर बक्षिसे मंजूषा ढोले, नरेशकुमार बोरीकर आणि शुभम मोहुर्ले यांना देण्या आलीत. स्पर्धेनिमित्ताने घेण्यात आलेल्या कवी संमेलनात नरेंद्र किन्नाके, सतीश लोंढे, बापूराव टोंगे, रंगनाथ रायपुरे, सदाशिव नन्नावरे, रोहिणी मंगरुळकर, मधुकर गराटे, रमेश भोयर, बाबा थुलकर, खुशालदास कामडी, सुरेश इंगळे, प्रदीप देशमुख, अनिल पिट्टलवार, रेवानंद मेश्राम, चन्ने, सरीता गव्हारे, सुरज गोरंटीवार, राजू पोईनकर आदींनी काव्यवाचन केले. प्रास्ताविक डॉ. मुसने यांनी केले. डॉ. मुसळे यांनी शाखेच्या कार्याचा आढावा घेतला. संचालन अविनाश पोईनकर यांनी तर आभार विलास उगे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)
निसर्ग व शेतकरी विषयांवर कवी संमेलन
By admin | Published: October 06, 2016 1:46 AM