लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय संविधानाने देशाला एकसंघ ठेवले. त्यातील मूलभूत तरतुदींच्या आधारावर या देशातील उपेक्षितांना चांगले दिवस येतात. परंतु राज्यकर्ते अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे संविधानाचा विचार गावखेड्यांमध्ये पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केले. प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचतर्फे रविवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडलेल्या व्याख्यानात ते बोलत होतेअध्यक्षस्थानी विनोद सोनटक्के, स्वागताध्यक्ष प्रशांत गजभिये तर प्रमुख मार्गदर्शक डॉ. चेतन खुटेमाटे, सुधाकर अडबाले, कपिल सरदार, डॉ. विनोद माहुरकर, नितीन डोंगरे दिलीप वावरे उपस्थित होते. बी. जी. कोळसे पाटील म्हणाले, वंचित समाजाच्या कल्याणासाठी अल्प तरतुद केली जाते. हा प्रकार अन्यायकारक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करून सामाजिक चळवळ उभारली. आजच्या धर्मांध वातावरणात नागरिकांनी संविधानाच्या बाजुने उभे राहून विषमतावादी विचारांचा प्रतिकार करावा, असेही निवृत्त न्यायमुर्ती कोळसे पाटील यांनी सांगितले. अध्यक्ष म्हणून विनोद सोनटक्के म्हणाले, संविधान हेच खरे स्वातंत्र्य होय. मंचाच्या वतीने नागरिकांच्या घरी भारतीय संविधान हा राष्टÑीय गं्रथ पोहोविण्याचा संकल्प करण्यात आला होता. १ जानेवारीला करून कोरेगाव भीमा येथील शूरविरांना मानवंदना देण्याचे कार्य केले. संविधान दिन साजरा करण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत १ हजार ९८६ नागरिकांच्या घरी १ हजार ९८६ संविधान ग्रंथ पोहोचविण्याचा संकल्प केला. डॉ. खुटेमाटे म्हणाले, संविधानात स्वातंत्र्य, समता, न्यायाचा विचार आहे. भारताचा नागरिक गरीब असताना देशात श्रीमंताची वाढ झपाट्याने झाली. युवकांना शिक्षण, रोजगाराची गरज असताना बजेटमध्ये कमी रक्कम तरतूद केल्या जाते. संचालन रितीक खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संविधानाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 10:37 PM
भारतीय संविधानाने देशाला एकसंघ ठेवले. त्यातील मूलभूत तरतुदींच्या आधारावर या देशातील उपेक्षितांना चांगले दिवस येतात. परंतु राज्यकर्ते अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे संविधानाचा विचार गावखेड्यांमध्ये पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केले. प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचतर्फे रविवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडलेल्या व्याख्यानात ते बोलत होते
ठळक मुद्देबी. जी. कोळसे पाटील : प्रियदर्शिनी सभागृहात व्याख्यान