अविनाश सोमनाथे : जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचा सत्कार
चंद्रपूर : जिल्ह्यात साथीचे आजार, लम्पी स्किन डिसीज, जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनी, पूरसदृश स्थितीमध्ये पशुसंवर्धन विभागाने वाखाणण्याजोगे काम केले आहे. हे काम करताना विभागातील प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळली. त्यामुळेच काम करणे शक्य झाल्याचे मत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. अविनाश सोमनाथे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. मंगेश काळे, प्रमुख अतिथी म्हणून मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पचारे, सत्कारमूर्ती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. अविनाश सोमनाथे, सहायक पशुसंवर्धन आयुक्त डाॅ. वटी, डाॅ. कडूकर, पशुधन विकास अधिकारी डाॅ. धांडे, उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी प्रीती खारतुडे आदींची या वेळी उपस्थिती होती.
या वेळी पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. मंगेश काळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सोमनाथे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी डाॅ. मंगेश काळे, अशोक मातकर, पचारे, डाॅ. वटी, डाॅ. कडूकर, डाॅ. धांडे, प्रीती खारतुडे, सहायक पशुधन विकास अधिकारी डाॅ. बंडू आकनुरवार, डाॅ. दिलीप भुसारे, कार्यालयाच्या वतीने डाॅ. सोनाली मेश्राम, कार्लेकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी दिघोडे, संदीप राठोड, पराते, प्रियंका यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन डाॅ. आकनुलवार, प्रास्ताविक डाॅ. दिलीप भुसारी यांनी मानले.