बाधित आलेल्या १३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ५, चंद्रपूर तालुका १, बल्लारपूर १, भद्रावती १, ब्रह्मपुरी १, सावली १, पोंभूर्णा १, राजुरा तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. नागभीड, सिंदेवाही, मूल, गोंडपिपरी, चिमूर, वरोरा, कोरपना व जिवती तालुक्यात मंगळवारी एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. जिल्ह्यात बाधितांची संख्या ८४ हजार ६६४ वर पोहोचली आहे. सध्या २२९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ५ लाख ५६ हजार ६२८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ६९ हजार २९५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात १५५७ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
कोरोना उद्रेक ओसरला; १३ पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:18 AM