चंद्रपूर जिल्ह्यात ८२ हजारांच्यावर कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे तर १४०० च्यावर बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. अकाली मृत्यूमुळे मालमत्ता हस्तांतरासह इतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे आपल्या पश्चात कुटुंबाला या समस्या भेडसावू नयेत या उद्देशाने अनेकजण मृत्यूपत्राचा आधार घेत आहेत. यामध्ये वकिलांमार्फत केल्या जाणाऱ्या रजिस्टर मृत्यूपत्रासह स्वत: पेपरवर लिहिल्या जाणाऱ्या मृत्यूपत्रांचा समावेश आहे.
बॉक्स
जमा केलेले मृत्यूपत्रावर भर
बऱ्याचदा मृत्यूपत्रातील मजकुराची माहिती घरातील सदस्यांना मृत्यूपर्वी होऊ द्यायची नसते. तेव्हा नोंदणी करणारा नोंदणीकृत केलेले मृत्यूपत्र, पाकिटात सील करुन दुय्यम निबंधकाकडे जमा करतात. याला जमा केलेले मृत्यूपत्र असे म्हणणात. जिल्ह्यात काही प्रमाणात असे मृत्यूपत्र होत असताना दिसून येत आहे.
बॉक्स
३० टक्क्यानी वाढ
संसर्गजन्य आजारांमुळे या नाशिवंत शरीराचा काही भरोसा नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना वकिलांकडे मृत्यूपत्राबाबत चौकशी करणाऱ्यांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. पूर्वी वयोवृद्धांकडून मृत्यूपत्राबाबत विचारपूस व्हायची आता नवविवाहित व अल्पवयीन तरुण देखील मृत्यूपत्र करुन ठेवत आहेत.
------
बॉक्स
नाममात्र शुल्कात नोंदणी
स्वमेहनतीने कमावलेल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र न करता एखादी व्यक्ती मरण पावली तर त्यांच्या कायदेशीर वारसांना त्यांचे नाव त्या संपत्तीत नोंदविण्यासाठी वारसान हक्क प्रमाणपत्र न्यायालयातून मिळवावे लागते. त्यासाठी संपत्तीच्या मूल्यांकनानुसार साधारण ७५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मृत्यूपत्र मात्र कितीही मालमत्ता असली तरी नाममात्र नोंदणी शुल्क भरून करता येते. साधारण वकिलाचा खर्च पकडून नोंदणीकृत मृत्यूपत्र दोन ते तीन हजार रुपयात तयार होते. तसा नोंदणी खर्च तर फक्त शंभर रुपये आहे.
कोट
कोरोनामुळे जीवनात अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यातच कोरोनामुळे वेगवेगळ्या ठिकाणी असणारे कुटुंबीय एकत्र आले आहेत. त्यामुळे आपसूकच संपत्तीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेकजण वकिलांकडून मृत्यूपत्र तयार करताना दिसून येत आहे. नोंदणी कायद्यानुसार मृत्यूपत्राची नोंदणी ऐच्छिक आहे. इच्छा असल्यास मृत्यूपत्राची नोंदणी करता येऊ शकते. वाद निर्माण झाल्यास अनोंदणीकृत मृत्यूपत्राच्या तुलनेत नोंदणीकृत मृत्यूपत्र सिद्ध करणे सोपे असते. म्हणून नोंदणी करणे केव्हाही श्रेयस्कर ठरते. स्वत:च्या मेहनतीने कमावलेल्या मालमत्तेची व्यवस्था न केल्यामुळे आपल्या मृत्यूनंतर कौटुंबिक कलह निर्माण होतात. हे घरगुती वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्राचा दस्त महत्वाचा ठरतो.
-ॲड. दीपक चटप, चंद्रपूर