बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही, नागरिकांची सर्वत्र गर्दी
कोरोना चाचणी करून घेण्याकडे नागरिकांचा कानाडोळा
लग्नसोहळ्यांसह इतर कार्यक्रमांचे आयोजन
चंद्रपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली. पहिल्या लाटेतील बेजबाबदारपणा यावेळी नागरिकांच्या अंलगट आला. आता तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किमान आता तरी नागरिकांनी जबाबदारीने आणि कोरोना नियमांना पाळणे गरजेचे आहे. नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही .
जिल्ह्यामध्ये कोरोनाची पहिली लाट आली. अनलाॅक होतपर्यंत जिल्ह्यात केवळ ५९७ रुग्ण होते तर २ दोघांचा मृत्यू झाला होता. ही लाट नागरिकांनी मनावर घेतली नाही. नियम असतानाही अनेकांनी नियमांना तिलांजली दिली. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम एवढेच नाही तर शाळा तसेच इतर सर्वच व्यवहार बिनदिक्कतपणे सुरू करण्यात आले. दरम्यान, मार्च महिन्याच्या शेवटी कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि आता रुग्णसंख्या हजारोंच्या घरात जाऊन पोहचली. या लाटेमध्ये अनेकांना आपल्या जवळच्यांना गमवावे लागले. ज्येष्ठांसह तरुणांचाही यामध्ये बळी गेला. कोरोना नियमांना पाळले असते तर किमान या जीवांना आपण वाचवू शकलो असतो. मात्र कोरोना नसल्यासारख्या स्थितीत प्रत्येक जण वावरत राहिले. १ जूनपर्यंत जिल्ह्यात ८२ हजार ९०३ एकूण कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली. यामध्ये १ हजार ४५४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना संकटाला नागरिकांनी मनावर घेतले नसल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये अनलाॅक होताच अनेकांनी लग्नसमारंभ मोठ्या थाटात साजरे केले. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमही मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आले. मोर्चे, आंदोलन आदी सर्व करण्यात आले. परिणामी कोरोनाची दुसरी लाट अनेकांचे संसार उद्ध्वस्त करून गेली. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी किमान आता तरी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
बाॅक्स
ॲनलाॅक
पहिला
४ ऑगस्ट २०२०
५९७
मृत्यू २
--
१ जूनपर्यंत
८२९०३
मृत्यू
---
महापालिका, महसूल विभागांच्या पथकांची नजर
१)कोरोनाची दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. अनेकांची जीव गेला. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी महापालिका तसेच महसूल प्रशासनाने विविध पथकांच्या माध्यमातून कारवाईतून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला.
२ शहरातील विविध दुकानांवर बंदी असताना अनेकांनी लपून, छपून व्यवसाय सुरूच ठेवला. त्यांच्याकडून लाखोंचा दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असतानाही तसेच लग्न समारंभामध्ये १२ नागरिकांनाच परवानगी असतानाही काहींनी नियम तोडला. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या पथकांकडून व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, पालिका, महसूल कर्मचाऱ्यांसह पोलिसांच्या पथकांनीही शहरात गस्त घालणे सुरू केले.