रविवारी ११ रुग्णांचा मृत्यू : ४९२ जणांचा आजपर्यंत गेला जीव
चंद्रपूर : एप्रिलच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत आहे. त्यातच मागील चार ते पाच दिवसांपासून दररोज रुग्णसंख्या पाचशे ते सातशेच्या वर जात असून रविवारी ही संख्या हजारीकडे गेली आहे. रविवारी एकाच दिवशी रुग्णसंख्या ९३७ वर पोहोचली आहे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. सातत्याने रुग्णवाढीमुळे जनमानसात दहशत पसरली असून मरण्यापेक्षा लाॅकडाऊन बरा, असे मत नागरिक आता व्यक्त करीत आहेत. आजपर्यंत ४९२ रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंत एकूण बाघित रुग्णांची संख्या ३३ हजार ५२९ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात मागील २४ तासांत ३०५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर ९३७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. ११ बाधितांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले असून त्यांचा मृत्यू झाला आहे.
बाॅक्स
रविवारचे मृत्यू धक्कादायक
रविवारी मृत्यू झालेल्यांमध्ये एका २९ वर्षीय तरुणाचा समावेश आहे, तर अन्य मृत्यूही ४० ते ५५ वर्षांदरम्यानचे आहेत. त्यामुळे केवळ वयोवृद्धांचाच कोरोनामुळे मृत्यू होतो, हा नागरिकांचा समजही खोटाच निघाला आहे. रविवारी झालेल्या मृत्यूंमध्ये सिंदेवाही येथील ६७ वर्षीय पुरुष, चंद्रपूर शहराच्या ऊर्जानगर येथील ४५ वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील ४३ वर्षीय पुरुष, रामनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील २९ वर्षीय पुरुष, बावणे लेआऊट वरोरा येथील ५१ वर्षीय पुरुष, शेगाव ता. वरोरा येथील ५० वर्षीय पुरुष, घुग्गुस येथील ५० वर्षीय पुरुष, गौराळा ता. भद्रावती येथील ५५ वर्षीय महिला, ख्रिस्तानंद चौक, भद्रावती येथील ४२ वर्षीय पुरुष, संताजीनगर भद्रावती येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बाॅक्स
बाधित रुग्ण
चंद्रपूर पालिका २४१
चंद्रपूर तालुका ४५
बल्लारपूर ४७
भद्रावती २२
ब्रह्मपुरी ५६
नागभिड ३२
सिंदेवाही २४
मूल ०९
सावली ४७
गोंडपिपरी ०६
राजुरा ३७
चिमूर ७३
वरोरा २२८
कोरपना ५०
जिवती ०७
इतर १३
बाॅक्स
मृत्यू- ११
एकूण बाधित ३३५२९
बरे झालेल्यांची संख्या २७७५९
ॲक्टिव्ह रुग्ण ५२७८
रविवारचे बाधित ९३७