बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील टेमुर्डा येथे २० मार्चला चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने लोखंडी खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला होता. यात चोरट्यांनी सहा लाख ८८ हजार रोख आणि चार लाखांचे सोने लंपास केले होते. या प्रकरणाचा तपास चंद्रपूर गुन्हे शाखेने करून, उत्तर प्रदेशसह काही स्थानिक आरोपींना अटक केली होती. यात टेमुर्डा येथील बँकेसह चोरट्यांनी आंध्र प्रदेश आणि इतर ठिकाणी चोरी केल्याचे उघड झाले होते. यातील तीन आरोपी वरोरा पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या आरोपींना न्यायालयात हजर करण्याआधी त्यांची कोरोना चाचणी केली असता, एक आरोपी हा कोरोना पॉझिटिव्ह तर दोन आरोपींचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वरोऱ्याचे ठाणेदार दीपक खोब्रागडे यांनी दिली.
बँक चोरी प्रकरणातील आरोपी कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:29 AM