चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची सुरुवात झाली तेव्हापासून तर आजपर्यंत एकूण ६ लाख ६६ हजार ८१० नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ५ लाख ७६ हजार ५६८ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच चार जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
बाधित आलेल्या ४ रुग्णांमध्ये मूल १, सावली १, गोंडपिपरी १, राजुरा १ तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील , चंद्रपूर तालुका, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, पोंभूर्णा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती या तालुक्यात रुग्ण आढळले नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६१५ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ३८ झाली आहे. सध्या ३८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५३९ बाधितांचे मृत्यू झाले आहे.