कोरोनाने जवजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊनमुळे घरी राहून सर्वजण कंटाळले आहेत. त्यामुळे कुटुंबासह वेळ घालविण्यासाठी, तसेच बदल म्हणून अनेकजण फिरण्यासाठी जात आहेत. कोरोनामुळे शासनाने सर्व धार्मिकस्थळे बंद ठेवली आहेत. त्यामुळे परराज्यांत हिल स्टेशन, तर जिल्ह्यात अमंलनाला, पकडीगुड्डम, सोमनाथ, सातबहिणीचे डोंगर आदी स्थळाला पसंती देत आहेत. चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील मुक्ताई येथील गर्दीचे फोटो व्हायरल झाल्याने हे पर्यटन बंद करण्यात आले. मात्र, इतर केंद्र सुरूच असून येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. यासोबतच मध्य प्रदेशातील पचमढी या हिलस्टेशनला जिल्ह्यासह राज्यातील पर्यटक पसंती देत आहेत. येथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. अनेकजणांनी साधा मास्कसुद्धा लावलेला दिसत नाही. विशेष म्हणजे परराज्यांत जाताना कोणत्याही राज्य सीमा किंवा जिल्हा सीमावर तपासणी किंवा साधी विचारपूस केली जात नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना दहशतीतही पर्यटन सफारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:32 AM