आज १९१ कोरोनामुक्त झाले हा एक दिलासा असला तरी मृतकांची संख्याही धडकी भरविणारी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २८ हजार ७४२ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २५ हजार ७६० झाली आहे. सध्या २५५० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ७९ हजार ५९० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख ४७ हजार ५०३ नमुने निगेटिव्ह आले. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील तुकूम येथील ६१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३२ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३९२ तेलंगणा, बुलडाणा, भंडारा, वर्धा येथील प्रत्येकी एक, गडचिरोली २० व यवतमाळ येथील १६ बाधितांचा समावेश आहे. गत २४ तासात जिल्ह्यातून १९१ कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा आणि ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
आज आढळलेले रुग्ण
चंद्रपूर मनपा क्षेत्र १२४
चंद्रपूर तालुका २७
बल्लारपूर १८
भद्रावती ०६
ब्रह्मपुरी ४४
सिंदेवाही १६
मूल ०६
सावली ०१
पोंभूर्णा ०१
राजूरा ०३
चिमूर ३८
वरोरा २६
कोरपना २३
अन्य ठिकाण ०२