शहरं
Join us  
Trending Stories
1
"मित्र तोट्यात जाऊ नये म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध केला"; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
3
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
4
गौतम अदानींबाबतच्या 'त्या' विधानावरुन अजित पवारांचा युटर्न; म्हणाले, "त्यांचा राजकारणाशी..."
5
IND vs SA : सेंच्युरियनच्या मैदानात प्रमोशन मिळालं अन् Tilak Varma नं ठोकली पहिली सेंच्युरी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, माझा एकच शब्द वळसे पाटलांना पराभूत करा'; शरद पवारांनी डागली तोफ
7
निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी
8
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
9
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
10
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
11
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
12
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
13
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
14
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
15
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
16
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
17
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
18
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
20
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार

मनपाची पाणीपुरवठा योजना तब्बल सहा कोटींनी ताेट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2022 5:00 AM

शहरात आजघडीला ८५ हजार मालमत्ता असल्या, तरी केवळ ३५ हजार नळ जोडणी आहेत. इरई धरण तथा दाताळा मार्गावरील इरई नदी या दोन ठिकाणांतून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यात या योजनेचे खासगीकरण करून कंपनीला ही योजना चालविण्यासाठी दिली होती. अगदी सुरुवातीला ठाकूर नावाच्या व्यक्तीच्या कंपनीला ही योजना संचालित करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, चांडक यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना संचालित केली जात होती. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील पाणीपुरवठा योजनेवर महापालिका वर्षभरात ११ कोटींचा खर्च करते. मात्र, पाणी कराच्या माेबदल्यात केवळ ४ कोटी ९५ लाखांचे उत्पन्न होत आहे. त्यामुळे वर्षभरात तब्बल सहा कोटींचा फटका बसत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.  चंद्रपुरात अमृत पाणीपुरवठा योजनेचे थाटात उद्घाटन झाले असले, तरी बऱ्याच प्रभागातील कामे अर्धवट तर कुठे सुरू आहेत. अजूनही अनेकांना अमृत योजनेचे पाणी मिळाले नाही. आगामी निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून उद्घाटन करण्यात आले, हे आता पुरते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ज्या प्रभागात अमृत योजनेचे पाणी पोहोचले नाही, तेथील नागरिक मनपा पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारून जेरीस आणत आहेत. शहरात आजघडीला ८५ हजार मालमत्ता असल्या, तरी केवळ ३५ हजार नळ जोडणी आहेत. इरई धरण तथा दाताळा मार्गावरील इरई नदी या दोन ठिकाणांतून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यात या योजनेचे खासगीकरण करून कंपनीला ही योजना चालविण्यासाठी दिली होती. अगदी सुरुवातीला ठाकूर नावाच्या व्यक्तीच्या कंपनीला ही योजना संचालित करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, चांडक यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना संचालित केली जात होती. या दोन्ही कंपन्यांकडून काम काढून घेतल्यानंतर, समरित यांच्या कंपनीकडे शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सोपविली होती. मात्र, या तिन्ही कंपन्यांमुळे मनपाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, असा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.

खासगीकरण रद्द   होऊनही समस्या जैसे थेचंद्रपूरकरांना पाणी नियमित मिळावे, यासाठी मनपाच्या आमसभेत पाणीपुरवठा योजनेच्या खासगीकरणाचा निर्णय रद्द करून, योजना स्वत: चालविण्याचा निर्णय घेतला. या घटनेला दोन वर्षे झाले. आता मनपा स्वत:च पाणीपुरवठा योजना संचालित करीत आहे. मात्र, चंद्रपूरकरांची पाण्यासाठी भटकंती संपली नाही.

पाणीपुरवठा एक   दिवसाआड काही दिवसांपूर्वी दररोज दोनदा नळाला पाणी येत होते. आता तर एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो. तोही नियमित नसल्याने घरातील घागरी रिकाम्या असतात. इरई धरणातून चंद्रपूरकडे येणारा पाइपलाइन फुटल्याने तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प होता.

तोटा भरून काढण्याकडे दुर्लक्ष- पाणीपुरवठा योजनेवरील खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने वर्षाकाठी सहा कोटींचा तोटा होत आहे.  - हा तोटा भरून काढण्यासाठी मनपाने काही उपाययोजनाच  केल्या नाही. त्यामुळे ही समस्या कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

 

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी