चंद्रपूर : आभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी सीआआयटी हा करिअरदर्शी प्रशिक्षण उपक्रम शैक्षणिक क्षेत्रातील नाविण्यपूर्व प्रयोग आहे. त्यामुळे विद्यार्र्थांच्या प्रशिक्षणाकरिता लागणारा खर्च गोंडवाना विद्यापिठाकडून देण्यात येईल, असे आश्वासन गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी दिले. येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात व टाटा टेक्नालॉजीच्या माध्यमाने उभारण्यात आलेले प्रशिक्षण केंद्र व सामंजस्य करारासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी विद्यापीठाच्या इन्व्होवेशन, इन्क्यूबेशन व लिंकेजेस विभागाचे संचालक डॉ मनीष उत्तरवार, प्राचार्य डॉ. सुधीर आकोजवार, समन्वयक डॉ संजय इंगोले, टाटा टेक्नालॉजीचे प्रतिनिधी, विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रशिक्षण व संशोधन केंद्र, विद्यापीठातील इन्व्होवेशन, इन्क्यूबेशन व लिंकेजेस विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण, संशोधन आदी वेगवेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. प्राचार्य डॉ.आकोजवार यांनी महाविद्यालय उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधाबाबत माहिती दिली. संचालन प्रा. सुशिल अंबाडकर यांनी केले. डॉ. राजेश सुरजुसे यांनी आभार मानले. आयोजनासाठी प्राचार्य डॉ. आकोजवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेश सुरजुसे, प्रा सुशिल अंबाडकर, प्रा. हसन रझा, प्राध्यापक व कर्मचाºयांनी सहकार्य केले.
बॉक्स
संशोधनाला चालना, रोजगाराच्या संधी
टाटाच्या वतीने धैर्यशील देसाई यांनी प्रशिक्षण केंद्राच्या स्वरूपाबाबत विवेचन केले. डॉ. मनीष उत्तरवार यानी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया विविध प्रशिक्षण सुविधांची माहिती दिली. उपकरण विभाग प्रमुख डॉ. जी जी. भूतडा यांनी सीआआयटी उभारणीसाठी राज्य शासन व टाटा समुहातर्फे निधी एकत्र करून कशाप्रकारे केंद्र्र उभारण्यात येईल याचा आढावा सादर केला. विद्यार्थ्यांचे संशोधन, पेटेंट्स व रोजगाराच्या संधीवर भाष्य केले.