लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे येथून जवळच असलेल्या म्हातारदेवी येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. कापूसही भिजल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.म्हतारदेवी येथील शेतकरी ईस्माइल अब्दुल लतिफ यांच्या गोठयावरील टिना उडाल्याने गोठ्यातील २८ क्विंटल कापूस पावसात भिजला. त्यामुळे या शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झालेइस्माईल लतिफ यांची चार एकर शेती आहे. त्यांनी शेतात यंदा कापसाची लागवड केली होती. उत्पादित कापूस वणी मार्केटमध्ये विकला. उर्वरित २८ क्विंटल कापूस गोठ्यात ठेवला होता. दरम्यान, शुक्रवारी वादळी पावसाने गोठयावरील टिना उडाल्याने २८ क्विंटल कापूस पावसात भिजला. त्यात त्यांचे दीड लाखाचे नुकसान झाले. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सदर शेतकऱ्याने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
वादळी पावसामुळे कापसाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 10:22 PM