लोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : सध्या कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांना मजुरांसाठी शोधाशोध करावी लागत आहे. अशातच शासनाने कापसाला जाहीर केलाला हमी भाव अत्यंत कमी व खासगी व्यापारीही अल्पदर देत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.एकरी कापसाच्या पिकाला वेचण्यापर्यंतचा उत्पादनाचा खर्च अंदाजे २५ हजार रूपयाच्या आसपास आहे. यात उत्पादन ५ ते ७ क्विंटल होत असते. मात्र सध्या प्रति क्विंटल ४३५० व ४४०० इतका कापसाला दर मिळत आहे. याची आकडेवरी काढली तर शेतकºयांच्या हाती काही लागत नाही. त्यामुळे शेतकरी संतापला असून कापसाला कमीत-कमी ५ हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी होत आहे.मजुरांचा अभावपरिसरात मजुरांचा अभाव असल्याने बाहेर गावातून कापूस वेचणीसाठी मजूर आणावे लागत आहे. त्यांना प्रती ७ रुपये किलोदराने भाव द्यावा लागत आहे. मजुरांना आणणाºया गाडीच्या खर्चाचा अधिकचा भर पडत असल्याने पुढील वर्षी कापसाचे पीक घ्यावे की नाही, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.वन्यप्राण्यांचा हैदोसएकीकडे अस्मानी संकटाना तोड द्यावे लागत असताना वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकºयांना हैराण केले आहे. रोही, डुकर, हरीण हे वन्यप्राणी कापूस पिकाला जमीनदोस्त करीत आहेत. त्यामुळे उभे पीक खाली पाडून नासधुस असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.दलाल सक्रियशेतकºयांच्या थेट दरवाजापर्यंत जाऊन त्यांना फूस लावून व्यापाºयांकडून शेतकºयांची मोठ्या प्रमाणात लूटमार होत आहेत. शेतकºयांची दिशाभूल करीत हमीभावापेक्षा कवडीमोल दराने कापसाची खरेदी व्यापारी करीत असून यात अनेक दलाल सक्रिय आहेत. अशा प्रकारची खरेदी न करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र त्याला न जुमानता व्यापारी वर्गाने आपला व्यवसाय चालू ठेवला आहे.शासनाने जाहीर केलेल्या भावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे मोठी नामुष्की ओढावली आहे. शासनाने विचार करून कमीतकमी ५ हजार रुपये भाव द्यावा.- शिवराम खेकारे, शेतकरी खर्डी.
कापसाच्या अत्यल्प भावामुळे शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 11:28 PM
सध्या कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांना मजुरांसाठी शोधाशोध करावी लागत आहे. ...
ठळक मुद्देउत्पादन खर्चही निघेना : शासनाचे हमी भावही कमीच