पोलीस अनभिज्ञ : नागरिक व व्यावसायिकांत भीतीवरोरा : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून वरोरा शहरात शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याची माहिती आहे. यामुळे नागरिक व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही या शहरात बनावट नोटा चलनात आल्या होत्या, हे विशेष.५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर शासनाने दोन हजार व ५०० च्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. नवीन दोन हजार व ५०० च्याही नोटा चलनातून बाद होण्याची अनामिक भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शंभर, पन्नास, वीस व दहा रुपयांच्या नोटांना नागरिक साठवून ठेवत असल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा घेत शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशा नोटा व्यावसायिकांना दिल्या जात असल्याची नागरिकात चर्चा आहे. घाई असल्याने नागरिक लगबगीने या नोटा आपल्या पॉकीटात टाकतात, त्या बनावट आहेत की नाही याची शहानिशा केली जात नाही. त्यामुळे नागरिकांची फसगत होत आहे. अनेकांना अशा बनावट नोटा मिळाल्या आहेत. मात्र पोलिसात तक्रार केल्यास पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल, या भीतीने कुणीही अद्याप पोलिसात तक्रार करण्यास धजावला नाही. (तालुका प्रतिनिधी)बनावट नोटा बँकेत जात नाहीबनावट नोटा तयार करणारे बँकेकडे फिरकत नाहीत. बँकेतील यंत्राद्वारे त्वरित बनावट नोट ओळखून आपण पकडले जाऊ, या भीतीने ते या बनावट नोटा बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी चालविल्या जात आहे.स्कॅनरचा उपयोगशंभरच्या नोटा अगदी सुक्ष्मपणे व बारकाईने बघितल्यास या नोटा स्कॅनरचा उपयोग करून तयार करण्यात आल्या असाव्या, असे जाणवते. या प्रकरणात परप्रांतीय टोळी सक्रिय असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
वरोऱ्यात बनावट नोटा चलनात
By admin | Published: March 04, 2017 12:35 AM