शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
2
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
3
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
4
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
5
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
6
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
7
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
8
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
9
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
10
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
11
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
12
Bhai Dooj 2024: बहिणीला ओवाळणीत काय भेटवस्तू द्यावी याचा विचार करताय? हे वाचाच!
13
'पाडव्याला नवऱ्याने स्तुती केल्यावर...'; अविनाश-ऐश्वर्या नारकर यांचा नवीन रील व्हिडीओ चर्चेत
14
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
15
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
16
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
17
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
18
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
19
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
20
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

दहा हजार प्रकरणांचा निपटारा करण्यास न्यायालय सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 5:00 AM

झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने समक्ष निकाल लावला जातो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्त्व असते व  अंमलबजावणीही करता येते. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सर्व तालुका विधी सेवा समित्यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो. सर्वांनाच जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने वाद टाळले जातात. त्यासाठीच शनिवार, दि.१० हजारांपेक्षा अधिक प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात येणार आहेत. सोप्या प्रक्रियेतून प्रकरणे निकाली काढून फायदे मिळविण्याची ही मोफत नामी संधी पक्षकारांना उपलब्ध झाली आहे.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार चंद्रपूर शहर व जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे.झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने समक्ष निकाल लावला जातो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्त्व असते व  अंमलबजावणीही करता येते. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सर्व तालुका विधी सेवा समित्यांनी दिली. नागरिकांना आपली प्रकरणे ठेवण्यासाठी संबंधित न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे समक्ष येऊन किंवा ०७१७२-२७१६७९ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. लाेकअदालतीत ठेवण्यात येणारी प्रकरणे  चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुका न्यायालयात एकाच दिवशी होणाऱ्या लोकअदालतीत दिवाणी, फौजदारी, कलम १३८ एन.आय. ॲक्ट (धनादेश न वटणे) वित्त संस्था, बँक कर्जवसुली, वाहन अपघात भरपाई, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक-भाडेकरू व कौटुंबिक वाद, वीज ॲक्टचे समझोता योग्य वाद, वाहन हायर परचेस व न्यायालयात येण्याअगोदरची (प्रिलिटिगेशन) प्रकरणे, पाणीपट्टी व वीजबिल आपसी समझोतासाठी ठेवण्यात येणार आहे. 

शनिवार होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत दाखल व दाखलपूर्व अशा १० हजारांहून अधिक केसेस सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवली जात आहेत. या अदालतीत विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.- कविता अग्रवाल,  मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत