चंद्रपूर : कोरोना संकाटमुळे मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. ऑनलाईन अभ्यासक्रम प्रत्येकांनाच शक्य झाला नाही. पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी काही दिवसापूर्वी शाळेत जाऊ लागले. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे आणखी शाळा बंद आहे. मात्र थेट अध्यापन आणि मोबाईलवरील अध्यापन आकलनात फरक पडत असल्याने या मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान झाले आहे. वाचन, लेखन, आकलनामध्ये फरक पडत असून, दीड ते दोन वर्षे हे विद्यार्थी मागे पडले आहे. शाळा सुरु होताच त्यांची उजळणी घ्यावी लागणार आहे.
दुसरं शैक्षणिक सत्र संपायला अवघे दोन महिने शिल्लक आहे. या दोन महिन्यात शिक्षकांना प्रचंड मेहन करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविणेही महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र यासाठी शिक्षकांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे.
पहिलं पाठ मागचं सपाट
ऑनलाईन अध्यापनात वेळेची मर्यादा होती. शिवाय मुले प्रत्यक्ष समोर नसल्याने आकलन झाले किंवा नाही, शिक्षकांना समजतच नव्हते. मुले दीड ते दोन वर्ष मागे पडली असल्याने तूट भरून काढावी लागणार आहे. शिक्षकांनी शकिवल्यानंतर सराव नसल्याने विद्यार्थी विसरत आहे.
गोंधळलेले विद्यार्थी
ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये नेटवर्क समस्येमुळे अनेकवेळा भाषेतील उच्चारात फरक पडत आहे. लेखनाचा सराव मोडल्याने मुले हात दुखत असल्याची तक्रार करतात. एका ठिकाणी बसण्यासही त्यांना आता कंटाळवाणे वाटत आहे. मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा कठीण वाटत आहे. त्यामुळे सध्या स्थितीत विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढली आहे.
शिक्षक म्हणतात...
कोरोना संकटामध्ये विद्यार्थी शाळेपासून दूर होते. काही ठिकाणी ऑनलाईन अध्यापन सुरु होते. काही दिवासपूर्वी शाळा सुरु झाल्या. मात्र कोरोना संकटामुळे आणखी शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये खंड पडत आहे.
-जे.टी. पोटे, शिक्षण समिती सदस्य, जि.प.चंद्रपूर
ऑनलाईन शिक्षणामध्ये मुले प्रत्यक्ष समोर नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. बहुतांश विद्यार्थ्यांचा लेखन तसेच वाचनाची सवय तुटली आहे. लिखाणातही मुले मागे पडत आहे. मुलांकडून अधिकाधिक वाचन, लेखनाचा सराव करून घ्यावा लागणार आहे.
-अनिल खुसपूरे, चंद्रपूर