दिलीप मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : खरिप पिकांबरोबरच तालुक्यात रब्बी पिकही मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. जंगली प्राण्यांचा हैदोस भरपूर असल्याने पिकांची नासाडी होते. त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कृषी मित्र विलास गुरनुले यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे करडई या काटेरी पिकांच्या बियाण्याची मागणी केली होती. ती लगेच मान्य झाल्याने मिनघरी येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.विज्ञानाची साथ, महत्वाकांक्षी विचार आणि उत्कृष्ट कार्य या त्रिसुत्रावर आधारीत सिंदेवाही तालुक्यातील २५०० लोकसंख्या असलेल्या मिनघरी या छोट्याशा गावामध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग काही शेतकऱ्यांनी केले. यामध्ये शेताच्या बांध्यांमध्ये प्लॉस्टिक टाकून धानाचे रोवणे असो की धानाचे रोप लागवडीसाठी विविध तंत्रज्ञान असो. असे अनेक प्रयोग येथे झाले आहेत. धानाचे उत्पादन व संपूर्ण पीक घरी येईपर्यंत येणारा खर्च यात बरीच तफावत असल्याने काही शेतकरी आत्महत्येकडे वळतात. मात्र कृषी मित्र विलास गुरनुले यांनी स्वत:च्या शेतामध्ये विविध नवनवीन प्रयोग करून जिल्हा कृषी अधिकारी यांच्यापासून वरिष्ठ कृषी क्षेत्रातील अधिकारी यांना मिनघरी गावाला भेट देण्यास प्रवृत्त केले, हे विशेष. अलिकडेच सर्वत्र मागणी असलेल्या ब्लॉक राईसची श्री पद्धतीने मंडल कृषी अधिकारी पि. के. मोतीकर आणि कृषीसेवक कोल्हापुरे यांच्या मार्गदश्रनात लागवड केली आणि ती यशस्वीही झाली.यासोबतच अलिकडे रब्बी पिकाच्या लागवडीला सुरूवात झाली असून परिसरात जंगली प्राण्यांचे वास्तव्य भरपूर असल्याने पिकाच्या नासाडीचा प्रश्न निर्माण झाला. मात्र ते प्रमाण कमी करायचे असेल तर इतर पिकांच्या सभोवताल करडई या काटेरी पिकाची लागवड केल्यास जंगली प्राण्यांपासून इतर पिकांचे संरक्षण होऊ शकते. ही संकल्पना समोर आल्यानंतर समृद्ध शेतकरी उन्नत शेती रब्बी पीक प्रयोगशाळा मेळाव्यात कृषी मित्र विलास गुरनुले यांनी जिल्हा कृषी अधिकारी उदय पाटील यांच्याकडे करडई पिकाचे बियाणे उपलब्ध करण्याची मागणी केली. आणि काही दिवसातच ती मान्य झाल्याने मिनघरी येथील ५६ शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन, तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पेरणीसाठी तयारी केली आहे. यातून शेतकऱ्यांनी खचून न जाता कृषी तंत्रज्ञान पद्धतीने शेती केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चामध्ये बचत करता येऊन उत्पन्न वाढीस हातभार लागणार असल्याचे कृषी मित्र विलास गुरनुले लोकमतशी बोलताना सांगितले.
वन्यप्राण्यांपासून रब्बी पिकांच्या संरक्षणासाठी करडई लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 6:00 AM
विज्ञानाची साथ, महत्वाकांक्षी विचार आणि उत्कृष्ट कार्य या त्रिसुत्रावर आधारीत सिंदेवाही तालुक्यातील २५०० लोकसंख्या असलेल्या मिनघरी या छोट्याशा गावामध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग काही शेतकऱ्यांनी केले. यामध्ये शेताच्या बांध्यांमध्ये प्लॉस्टिक टाकून धानाचे रोवणे असो की धानाचे रोप लागवडीसाठी विविध तंत्रज्ञान असो.
ठळक मुद्देयशस्वी प्रयोग : मिनघरी येथे ५६ शेतकऱ्यांनी घेतला पुढाकार