आॅनलाईन लोकमतचिमूर : भारतीय संविधानाने देशातील सर्वांना समान अधिकार प्रधान केले आहेत. या संविधानामुळेच आजही देश अखंड असून प्रत्येकांचे अधिकार सुरक्षित आहेत. संविधान हा देशाचा ग्रंथ आहे. तेव्हा देशात संविधानाची संस्कृती निर्माण करावे, असे आवाहन प्रा जोगेंद्र कवाडे यांनी केले.आम्रवन दीक्षाभूमी सुगतकुटी भिक्खु संघ संस्था व बौद्ध पंचकमिटी मालेवाडा यांच्या वतीने सुगतकुटी येथे दोन दिवशीय धम्म मेळावा नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून आ. कीर्तीकुमार भांगडिया, राजरतन कुंभारे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा गटनेते डॉ सतीश वारजूकर, पं.स. सभापती प्रज्ञा चौधरी, जि.प सदस्य गजानन बुटके, ममता घनश्याम डुकरे, प्रा. अशोक रामटेके, वसंता वारजूकर, धर्मा पाटील, जयंत गोरकार उपस्थित होते.दोन दिवसीय धम्म मेळावा व संविधान संस्कृती संमेलनात पहिल्या दिवशी समता सैनिक दलातर्फे पथसंचालन करण्यात आले. त्यानंतर पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून बुद्ध, धम्म, संघ वंदना घेऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्दितीय सत्रात बुद्ध भीम गितांचा कार्यक्रम तर तृतीय सत्रात ‘संविधान संस्कृती समोरील आव्हाने’ या विषयावर परिसवांद पार पडला. यामध्ये जिदा भगत, जावेद खान, नंदा फुकट, बी.डी. नानवट, प्रा.भगवान नन्नावरे सहभागी झाले होते. तर दुसºया दिवशी सकाळी भिक्खू संघाची धम्मदेसना आदी कार्यक्रम पार पडले.यावेळी प्रा. कवाडे पुढे म्हणाले, मालेवाडा सुगतकुटीला तीर्थ स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करावा, त्यानंतर विकासासाठी निधी उपलब्ध करण्यास सुलभ होणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली नसती, तर देश आजपर्यत अखंड राहला नसता. देशाचे आज पन्नास तुकडे झाले असते. संस्काराने माणूस घडतो. तेव्हा डॉ. बाबासाहेब व भगवान बुद्धांचे विचार आई-वडिलांने मुलांना दयावे. धम्म मेळाव्यात आ. कीर्तीकुमार भांगडीया यांनी या भूमीचा गोंदेडा गुंफाच्या धर्तीवर विकास करण्याचा विश्वास दिला. याप्रसंगी डॉ. वारजुकर, जि.प.सदस्य गजानन बुटके यांचीही भाषणे झालीत. संचालन प्रकाश मेश्राम तर आभार एकनाथ गोंगले यांनी मानले.
देशात संविधानाची संस्कृती निर्माण करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:05 AM
भारतीय संविधानाने देशातील सर्वांना समान अधिकार प्रधान केले आहेत. या संविधानामुळेच आजही देश अखंड असून प्रत्येकांचे अधिकार सुरक्षित आहेत.
ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे : मालेवाडा येथे धम्म मेळावा, असंख्य बौद्ध अनुयायांची उपस्थिती