लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छता व आरोग्याचा जवळचा संबंध आहे. अस्वच्छतेमुळे विविध आजाराला बळी पडावे लागते. अस्वच्छतेचा समूळ नायनाट करण्याकरिता ग्रामस्थांनी गावा-गावात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी स्वच्छताग्रही म्हणून अभिप्रेरकाची भूमिका पार पाडणे काळाची गरज असून, प्रत्येकांमध्ये शाश्वत स्वच्छतेची मानसिकता निर्माण करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.जिल्ह्यात सर्वत्र गावागावात जागतिक शौचालय दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. चंद्रपुरात जिल्हा स्तरीय कार्यक्रम जिल्हा परिषदच्या कन्नमवार सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता ओमप्रकाश यादव जि. प चे सर्व विभाग प्रमुख, व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सामाजिक कर्तव्य म्हणून किमान आपले जन्मगाव दत्तक घेऊन गावाला शाश्वत स्वच्छच्या दिशेने मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करा व गावाला शाश्वत स्वच्छतेच्या मार्गावर नेण्याचा संकल्प करावा असे, आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.जिल्हाभरात जनजागृतीपर कार्यक्रमजिल्हाभरात जागतिक शौचालय दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हास्तर व पंचायत समितीस्तरावरुन संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. याद्वारा प्रत्येक कार्यक्रमाचे यशस्वी सनियंत्रन जिल्हा पातळीवरुन करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक ठिकाणी नादुरुस्त शौचालय बांधकामाचा शुभारंभ करुन, शौचालय दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली. तसेच कलापथक, स्वच्छता फेरीतून जनजागृती करण्यात आली. उत्कृष्ठ काम करणाºयांचा सत्कार, मार्गदर्शन पर सभा घेऊन गावस्तरावर स्वच्छतेचा जागर निर्माण करण्याचे काम केल्या गेले. यावेळी सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तसचे संबंधित तालुक्यातील विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाश्वत स्वच्छतेची मानसिकता निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:32 PM
स्वच्छता व आरोग्याचा जवळचा संबंध आहे. अस्वच्छतेमुळे विविध आजाराला बळी पडावे लागते. अस्वच्छतेचा समूळ नायनाट करण्याकरिता ग्रामस्थांनी गावा-गावात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी स्वच्छताग्रही म्हणून अभिप्रेरकाची भूमिका पार पाडणे काळाची गरज असून, प्रत्येकांमध्ये शाश्वत स्वच्छतेची मानसिकता निर्माण करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
ठळक मुद्देजितेंद्र पापळकर : जागतिक शौचालय दिन जिल्हाभर उत्साहात साजरा