शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

पाहार्णी ग्रामपंचायतमध्ये सात लाखांचा भ्रष्टाचार

By admin | Published: April 06, 2017 12:33 AM

पाहार्णी येथील ग्रामपंचायती अंतर्गत विविध कामात गैव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.

ग्रामस्थांचा आरोप : बीडीओच्या चौकशीत सिद्धनागभीड : पाहार्णी येथील ग्रामपंचायती अंतर्गत विविध कामात गैव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सरपंच दोषी असल्याचे संवर्ग विकास अधिकारी यांच्या चौकशीत सिद्ध झाले असून आता सरपंच देवानंद बावणकर यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पाहर्णी ग्रामपंचायतीच्या हद्दीत काँक्रीट रोड बनविण्यात आले. मात्र बिलाप्रमाणे साहित्य प्राप्त झाले नाही. साहित्य कमी प्राप्त होऊनही जादा साहित्याचे बिल पं.स. कार्यालयाला सादर करुन शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. सरपंचासोबत सचिवानेही कर्तव्यात कसूर केली असून कोणत्या बांधकामाला किती साहित्य याबाबत अद्यावत नोंदी सचिवाने घेतल्या नाही.या रस्त्याचे काम थांबल्यानंतर चार लाख ९७ हजार रुपयांचे साहित्य शिल्लक असावयास पाहिजे. मात्र कोणतेही साहित्य शिल्लक आढळले नाही. ग्रामपंचायतीचा प्रकार अन्य ग्रामसेवकांकडे सोपविल्यानंतर हा साठा नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेवकाकडे सोपविण्यात आला नाही. यावरुन चार लाख ८७ हजार रुपये किंमतीच्या साहित्याची अफरातफर झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या प्रकरणी सरपंच आणि सचिव यांना जबाबदार का धरण्यात येवू नये असा शेरा संवर्ग विकास अधिकारी यांनीच मारल्याने या भ्रष्टाचाराला पुष्टीच मिळाली आहे, असाही आरोपही ग्रामस्थांनी यावेळी केला. ग्रामपंचायतीने मागणी केल्यानुसार या रस्त्याच्या बांधकामासाठी दहा लाख ५१ हजार ४२३ रुपये उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र साहित्य पुरवठाधारकास काहीही सबळ कारण नसताना रक्कम वितरीत करण्यात आली. यावरुन साहित्य खरेदी न करता बनावट बिलाचे आधारे शासनाकडून रकमेची मागणी केल्याचे या चौकशीत आढळून आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. एवढेच नाही तर माहिती दर्शक फलक न लावता तीन फलकांचा खर्च नमुद करुन हा खर्चही उचलण्यात आला आहे. याशिवाय अंदाजपत्रकात तरतूद नसतानाही साहित्याची खरेदी केल्याचे दर्शवून नियमबाह्य खर्च काही हजारांच्या घरात दाखविण्यात आला आहे. जवळपास सात लाख रुपयांचा हा भ्रष्टाचार आहे. या सर्व बाबी संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या चौकशीतच सिध्द झाल्यात आहेत. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कारवाई न झाल्यास पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी किशोर निरगुडे, माजी सरपंच पुरुषोत्तम बगमारे, मंगेश मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)