लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने खरीप हंगामातील उत्पादन घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सद्य:स्थितीत सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र जमिनीतील ओलावा संपत असल्याने याच पिकाला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यामध्ये यंदा कापूस आणि सोयाबीन लागवड क्षेत्र वाढले. राजुरा, गोंडपिपरी जिवती, बल्लारपूर, कोरपना, भद्रावती, वरोरा आदी सात तालुक्यांमध्ये कापसासोबतच हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली. बहुतेक शेतकºयांनी गतवर्षीचे बियाणे टाळून नव्या संकरित बियाण्यांचा वापर केला. सोयाबीन झाड जोमाने बहरले. सध्या हे पीक दाणे भरण्याची अवस्थेत आहे. याच अवस्थेमध्ये सोयाबीनला पाण्याची अत्यंत गरज असते. परंतु दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने दाणे भरणार की नाही, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहे. कापूस पिकावरही विविध कीडींनी आक्रमण केले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव कमी आहे. अनेक शेतकºयांनी बोंड अळीची लक्षणे दिसायला लागण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केली होती. याचा बºयापैकी फायदा झाला आहे. हे पीक बोंड अळीपासून वाचले. पण पाण्याअभावी उत्पादनात घट होण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. उत्पन्न झाले नाही तर आर्थिक संकटांना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.जमिनीतील ओलावा संपू लागलासोयाबीनवर चार प्रकारच्या किडींचा प्रादूर्भाव झाला आहे. यासाठी जमिनीतील कमी झालेला ओलावा कारणीभूत असल्याचे कृषी अधिकाºयांनी सांगितले. पाने खाणारी अळी, उंट अळी, पाणे गुंडाळणारी अळी आणि चक्री भुंगेरे कीड्यांनी सोयाबीन झाडांवर आक्रमण केले. १० ते १५ दिवसांत पुरेसे पाणी मिळाले नाही तर या कीडींमुळे सोयाबीन फस्त होण्याचा धोका वर्तविला जात आहे.कृषी विभागाचा पीक अंदाज निघालाच नाहीयंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन कापूस व अन्य कडधान्यांचे हेक्टरी किती उत्पन्न होऊ शकते, याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून तीन टप्प्यांमध्ये काढला जातो. मात्र पहिल्या टप्प्यातीलच अंदाज अद्याप जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे यंदा नेमके किती उत्पन्न होणार, याविषयी कृषी विभागातच मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
पावसाअभावी पिके संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:23 AM
मागील १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने खरीप हंगामातील उत्पादन घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सद्य:स्थितीत सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र जमिनीतील ओलावा संपत असल्याने याच पिकाला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देदोन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता : सोयाबीनला सर्वाधिक फटका