घरकूल योजना : सोनियानगरवासी पितात नालीतील बोअरिंगचे पाणीबी. यू. बोर्डेवार राजुराराजुरा नगर परिषदेंतर्गत घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून घरांना भेगा पडल्या आहे. स्लॅबचे पाणी गळत आहे. स्थानिक सोनियानगरमधील नागरिक नालीमधील बोअरिंगचे पाणी पित आहेत. या भागात फेरफटका मारला असता येथील नागरिकांनी आपबिती सांगितली. घरकुलाचे काम योग्य नसुन अनेक घरकुलांना भेगा पडल्या आहेत. स्लॅब गळत आहे. फक्त १२ बॅग सिमेंटमध्ये स्लॅब टाकण्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली.येथील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही. नागरिकांना नाईलाजाने अस्वच्छ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सोनियानगरच्या बाजूलाच घनकचरा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत.करोडो रुपयांची घरकुल योजना तयार झाली. मात्र या घरकुलाच्या बांधकामाची स्थिती योग्य नाही. यामुळे या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे विरोधी पक्षनेते प्रा. अनिल ठाकुरवार यांनी केली आहे.शौचालयासाठी तीन फुटाचे निकृष्ट पाईप बसविण्यात आले. त्यामुळे सर्व शौचालय बंद स्थितीत आहेत. नगरपालिकेत अनेक चकरा मारल्या परंतु आमच्या वस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. करेडोची कामे झाली. परंतु कामाची दर्जा योग्य होताना दिसत नाही. या वॉर्डातील नगरसेवक कोण आहे हेच, नागरिकांना माहित नाही. निवडणूक झाली की पाच वर्षानी पुन्हा मते मागण्यासाठी येतात. येथील गरिबाची अवस्था दयनिय आहे. नालीमधील बोरिंगचे पाणी पित आहे. ही गंभीर बाब आहे.
करोडोच्या घरकुलाला पडल्या भेगा
By admin | Published: February 21, 2016 12:31 AM