लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सोमवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी पर्यटकांची झुंबड उडाली असून ७८ जिप्सींना प्रवेश देण्यात आला. यामध्ये विदेशी पर्यटकांचा समावेश होता.पावसाळा असल्यामुळे १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद ठेवण्यात आले होते. बफर झोनमध्ये जिप्सींना प्रवेश दिला जातो. ताडोबात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची ताडोबाला पसंती असते. ताडोबात काळा बिबट आढळून आला होता. तेव्हापासून काळा बिबटही पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. सोमवारी पर्यटनाच्या पहिल्याच दिवशी ताडोबात पर्यटकांची गर्दी उसळली.दिवसाच्या दोन्ही सफारीमध्ये ७८ जिप्सींना सोडण्यात आले. मोहर्ली गेटवर पर्यटकांची गर्दी दिसत होती. पावसाळा संपला असला तरी थंडी अजूनही सुरू झालेली नाही.पावसाळा असला तरीही कडक उन्ह तापत असल्यामुळे वाघ जंगलातून बाहेर पडणार आणि दिसणार, असे पर्यटकांमध्ये कुतुहल आहे. दसरा, दिवाळी व ख्रिसमसच्या सुटीत पर्यटकांची गर्दी वाढतील, अशी माहिती ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रदिप यांनी दिली. आॅनलाईन बुकींग आतापासूनच हाउसफुल्ल होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे यावर्षी ताडोबात गर्दीचे सर्व विक्रम तोडल्या जाईल, असेही बोलले जात आहे.ताडोबात नवा पाहुणालक्ष्मी नावाच्या हत्तीणींने एका पिलाला रविवारी सकाळी जन्म दिला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात या पिलाच्या रुपाने एका नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. कर्मचाऱ्यांनी नव्या पाहुण्यांचे जोरदार स्वागत केले आहे. ताडोबा व्यवस्थापन लक्ष्मी व पिलांची विशेष काळजी घेत आहे.
ताडोबात पहिल्याच दिवशी पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 11:19 PM
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सोमवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी पर्यटकांची झुंबड उडाली असून ७८ जिप्सींना प्रवेश देण्यात आला. यामध्ये विदेशी पर्यटकांचा समावेश होता.
ठळक मुद्दे७८ जिप्सींना मिळाला प्रवेश