चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामध्ये रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यातच आपल्या जिल्ह्याची स्थिती आणखी गंभीर आहे. या जिल्ह्यात सिकलसेल व थॅलेसेमियाचे रुग्ण असल्याने गंभीर स्थिती आहे. या रुग्णांना रक्ताशिवाय दुसरा पर्याय नाही. कोरोनाच्या संकटात रक्तदात्यांची संख्या कमी झाल्याने हे रुग्ण रक्तासाठी भटकत आहेत. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासावी, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले.
आय. एम. ए. सभागृह येथे मोदी सरकारच्या सप्तवर्षीपूर्तीनिमित्त आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्रपरिवारातर्फे रक्तदान शिबिर पार पडले. शिबिराच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून भाजप महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती अध्यक्ष रवी आसवानी, राजेंद्र गांधी, नगरसेवक सुभाष कासनागोट्टुवार, रवींद्र गुरनुले, प्रकाश धारणे, संजय कंचर्लावार, भाजप मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, रामकुमार अकापेल्लीवार, स्वेच्छा रक्तदान शिबिर प्रकल्प संयोजक प्रशांत विघ्नेश्वर उपस्थित होते. याप्रसंगी प्रकाश धारणे, शुभम शेगमवार, विवेक कुलकर्णी, कमलेश नंदनवार, वैष्णवी अडावदकर यांनी रक्तदान केले. पुढील ३० दिवस हे शिबिर सुरू राहणार असल्याचे डॉ. गुलवाडे यांनी सांगितले. प्रास्ताविक सुभाष कासनागोट्टुवार, संचालन प्रशांत विघ्नेश्वर तर आभार आकापेल्लीवार यांनी मानले. रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. मृदुल खोब्रागडे व समाजसेवा अधीक्षक पंकज पवार यांच्या चमूने भूमिका बजावली.