शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

पटावरील बंदी उठविल्याने संस्कृतीला मिळणार उजाळा

By admin | Published: January 11, 2016 1:04 AM

मंडई, नाटक आणि शंकरपट या तीन गोष्टींना झाडीपट्टीत अनन्य साधारण महत्त्व आहे. यापैकी शंकरपटावर लादण्यात आलेली ...

जुने वैभव पुन्हा येणार : झाडीपट्टीत उत्साहाला उधाणघनश्याम नवघडे नागभीडमंडई, नाटक आणि शंकरपट या तीन गोष्टींना झाडीपट्टीत अनन्य साधारण महत्त्व आहे. यापैकी शंकरपटावर लादण्यात आलेली बंदी केंद्र सरकारने नुकतीच उठविल्याने झाडीपट्टीत उत्साहाला उधान आले आहे. बंदी उठल्याने झाडीपट्टीचा हा उत्सव लवकरच सुरू होणार आहे.झाडीपट्टीत प्रामुख्याने चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. या चार जिल्ह्याचे प्रमुख आणि एकमेव पीक धान हेच आहे. या धान पीकाच्या हंगामाचा काळ जुलै ते डिसेंबर असा आहे. हा हंगाम झाल्यानंतर शेतकरी तसा मोकळाच असतो. या मोकळ्या वेळेत मनोरंजन म्हणून मंडई, नाटक आणि शंकरपटात तो आपला वेळ घालवण्यासाठी या प्रथा पडल्या असाव्यात, असे मत अनेकजण व्यक्त करीत असतात.साधारणत: दिवाळीपासून नाटक आणि मंडईची रेलचेल सुरू होत असली तरी शंकरपटांचा आरंभ मात्र मकरसंक्रांतीपासून सुरू होतो आणि तो जून, जुलैपर्यंत सुरू असतो. दोन-तीन दशकांपूर्वी शंकरपट प्रत्येक गावात भरवले जायचे. शंकरपट भरविण्यामागे या निमित्ताने नातलगांच्या भेटीगाठी आणि उपवर वधू-वरांची पाहणी हे सुद्धा कारण सांगितले जाते. पण आता काळ बदलला आणि याचबरोबर त्याच्या व्याख्याही बदलल्या. तशा शंकरपटावरही मर्यादा आल्या. शंकरपटाची ‘दान’ ही गावाजवळ वाहत असल्याने बदलत्या नागरिकरणात या दानीवर अतिक्रमणे झाली. काही गावातील दानी जंगल कायद्याच्या कचाट्यात सापडल्या तर मनोरंजनाची दालणे आता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने काहीसे शंकरपटाकडे दुर्लक्ष सुद्धा केले.असे असले तरी शंकरपटाचे वेड काही कमी झाले नाही. याची प्रचिती नागभीड तालुक्यातील मसली, सावरगाव, गिरगाव, गोविंदपूर, वढोणा, सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी, रत्नापूर, शिवणी, ब्रह्मपुरी तालुक्यात हळदा, मुडझा, रान्होरी, दिघोरी, सावली तालुक्यातील मगरमेंढा या गावात अनेकांनी घेतली आहे. लोक अक्षरश: झपाटून जात असतात. मिळेल त्या वाहनाने आणि भेटेल त्या सवंगड्यासोबत जावून शंकरपटाचा आनंद घेत असत.न्यायालयाच्या एका निर्णयानुसार मागील दोन वर्ष शंकरपटावर बंदी लादण्यात आली होती. त्यावेळी पटप्रेमी आणि ज्या गावात पटाचे आयोजन होते, त्या परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. म्हणूनच या निर्णयाविरोधात अनेकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. एवढेच नाही तर शंकरपट हे महाराष्ट्राचे मनोरंजन कसे आहे हे सुद्धा केंद्र शासनाला पटवून देण्यात आले. सर्व खात्री झाल्यानंतरच केंद्र शासनाने शंकरपटावर लादण्यात आलेली बंदी उठविली.केंद्र शासनाने शंकरपटावरील बंदी उठविल्यानंतर झाडीपट्टीत उत्साहाला उधान आले आहे. गेली दोन वर्ष शंकरपटावर बंदी असल्याने अनेकांनी आपले पटाचे बैल शेतीच्या कामात काढले होते. छकडे अडगळीत टाकले होते. पटाच्या दानीकडे दुर्लक्ष केले होते. या सर्वांना आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत.