चंद्रपूर : शहरात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून या अवैध व्यवसायांना आळा घालावा, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी आहे. मात्र येथे मोठ्या प्रमाणात दारुविक्री केल्या जाते. यासोबतच अमली पदार्थांची शहरात मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येत आहे. राज्यात बंदी असलेला सुगंधित तंबाखू, गांजा, ड्रग्स, यासारख्या अमली पदार्थांचा समावेश आहे. या व्यवसायामध्ये गुंड प्रवृत्तीचे युवक सहभागी झाले असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे अवैध व्यवसायाला आळा घालावा, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, राशीद हुसेन, विलास वनकर, सलीम शेख, आदी उपस्थित होते.