गोंडपिपरी तालुक्याला वर्धा, वैनगंगा, अंधेरी नद्या व लहान-मोठे नाले लाभलेले आहे. यात उच्च प्रतीची रेती मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, या रेतीला जिल्ह्यात मोठी मागणी आहे. सहज उपलब्ध होणारी रेती आणि वाढती मागणी बघून गोंडपिपरी व राजुरा येथील रेती माफियांनी या तालुक्यात आपले बस्तान मांडल्याने अवैध रेती तस्करीचे जाळे तालुकाभर पसरले आहे. तारडा, कुलथा, येनबोथला, तारसा, पूर्डीहेटी, हिवरा या नदी घाटावरून रात्रपाळीला मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन करून रेती उपसा केला जात आहे. मात्र याकडे स्थानिक महसूल अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. येत्या सात दिवसांत चौकशी करून दोषी महसूल अधिकारी व अवैध रेती तस्करांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकेश वानोडे, हरमेल सिंग डांगी, तालुकाध्यक्ष ॲड. प्रफुल आस्वले, स्वतंत्र भारत पक्षाचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष व्यंकटेश मल्लेलवार व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील अवैध रेती तस्करीवर आळा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:32 AM