लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घरपोच मिळणाऱ्या गॅस सिलिंडरची तपासणी आणि वजन करणे नियमाने अनिवार्य आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करीत डिलिव्हरी करणारे तपासणी आणि वजन करणे टाळतात. याबाबत ग्राहकदेखील जागरुक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक ग्राहकांना कमी वजनाचे सिलिंडर मिळत असून त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.विनातपासणी केलेला एखादा, धोकादायक सिलिंडर घरी आल्यास त्यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर वजन करूनच घ्यावे, असे आवाहन करण्यात आले असून नुकसान टाळण्यासाठी ग्रत्येक ग्राहकांनी गॅस सिलिंडर घेताना सतर्क राहणे गरजेचे आहे.परिपत्रकाचीही होते अवहेलनाभारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडिया ऑइल या प्रमुख कंपन्याच्या डीलर्सतर्फे सिलिंडर घरपोच देताना त्याची संपूर्ण तपासणी आणि वजन करण्याची जबाबदारी ग्राहाकांची आहे. बºयाचदा डिलिव्हरी करणाऱ्यांकडे वजन करण्याचे मशीन नसते. त्यामुळे ग्राहकांना कमी वजनाचे सिलिंडर मिळते. सिलिंडरची तपाससणी आणि वजन करून देण्याचे परिपत्रक कंपन्यांनी काढले आहे. नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रत्येक डिलर्सला देण्यात आल्या आहेत. पण कंपन्यांच्या सूचनांचे पालन होत नसून ग्राहकांना अनेकवेळा नुकसानीचा सामना करावा लागत आहे.जास्त पैशाची मागणीघरपोच सेवा देताना अनेकवेळा डिलिव्हरी बॉय अतिरिक्त पैशाची मागणी करतात. आम्हाला डीलर्स घरी सिलिंडर पोहोचविण्याचे पैसे देत नाही, अशी सबब सांगून ते किंमतीपेक्षा जास्त पैसे वसूल करतात. ग्राहक निमुटपणे पैसे देवून मोकळे होतात. त्याला पैसे देण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची आहे. मात्र अनेकवेळा ते देत नसल्याच्या तक्रारी डिलिव्हरी बॉय करीत असून ते ग्राहकांकडून पैशाची मागणी करतात.नियमांचे पालन व्हावेवैधमापक शास्त्र अधिनियम २०१९ अंतर्गत ग्राहकांना सिलिंडर देताना वजन करून देणे बंधनकारक आहे. सिलिंडरवर उल्लेख केलेल्या वजनापेक्षा कमी असेल तर परत करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. घरगुती गॅस सिलिंडरमध्ये निव्वळ गॅसचे वजन १४.२ किलो असणे आवश्यक आहे. याबाबत टो फ्री क्रमांकावर तक्रार करता येते.ग्राहकांची जबाबदारी महत्त्वाचीघरी गॅस सिलिंडर आल्यानंतर त्याची तपासणी आणि वजन करण्याची सक्ती करणे, ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. अशा प्रकारची तपासणी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याचे ग्राहकांना माहिती नसल्यामुळे त्यांच्याव्दारे सक्ती केली जात नाही. परिणामत: कमी वजनाचे, लिकेज असलेले सिलिंडर त्यांना वापरावे लागते. याबाबत ग्राहकांनी जागृक असायला हवे आणि सिलिंडर वजन करूनच घ्यावे.वैधमापन शास्त्र विभागातर्फे तपासणी नाहीचवैधमापन विभागाही घरगुती सिलिंडरच्या वजनाची तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अनेकवेळा या विभागाचे अधिकारी तपासणी करीतच नसल्याचे दिसून येते. दर महिन्याला घरगुती सिलिंडरचे वजन आणि पेट्रोल पंपावरील मापाची तपासणी करणे बंधनकारक असतानाही त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करतात.
ग्राहकांनो सावधान, गॅस सिलिंडरची करा तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:00 AM
गॅस सिलिंडरची तपासणी आणि वजन करणे नियमाने अनिवार्य आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करीत डिलिव्हरी करणारे तपासणी आणि वजन करणे टाळतात. याबाबत ग्राहकदेखील जागरुक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक ग्राहकांना कमी वजनाचे सिलिंडर मिळत असून त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. विनातपासणी केलेला एखादा, धोकादायक सिलिंडर घरी आल्यास त्यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देग्राहक संघटनांचे आवाहन : नुकसान टाळण्यासाठी ग्राहकांनी गॅस सिलिंडरचे वजन करणे गरजेचे