शहरात डासांचा उपद्रव
चंद्रपूर : शहरातील अनेक वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. डासांमुळे आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
झुडपांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले
चंद्रपूर: जिल्ह्यातील अनेक वळण मार्गावर झुडपे वाढली आहे. त्यामुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाही. अनेकदा येथे अपघातही घडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.
श्रावणबाळ लाभार्थी वेतनाच्या प्रतीक्षेत
चंद्रपूर : श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी वेतनापासून वंचित असून त्यांना तातडीने वेतन देण्यात यावे, अशी मागणी आहे. बहुतांश तालुक्यातील लाभार्थ्यांची संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेसाठी निवड करण्यात आली.
कार्यालयात तक्रारपेट्याची मागणी
चंद्रपूर : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांबाबत अनेकांच्या तक्रारी असतात. काही जण त्या प्रत्यक्ष सांगू शकत नाही. अशांना आपल्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचविता याव्यात, यासाठी प्रत्येक कार्यालयात तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र आज या सर्व तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत.
ग्रामीण रस्ते दुरुस्त करण्याची मागणी
चंद्रपूर: जिल्ह्यातील काही तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेले अनेक रस्ते काही वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांत रोष पसरला असून रस्ते दुरुस्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.