लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : द मोबाईलवर कोणते ना कोणते कारण सांगून बॅंक खात्यातील रकमेच्या मोठ्या प्रमाणावर चोऱ्या सुरू आहे. याचा तपास लावण्यासाठी पोलीस खात्याने सायबर सेल तयार केले. या चोऱ्यांचा छडा लावण्यात व्यस्त असलेल्या चंद्रपूर पोलिसांनाच सायबर गुन्हेगारीने ‘एसपी चंद्रपूर’ या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करून थेट आव्हान दिले आहे. या बनावट फेसबुक आयडीवरून सुरुवातीला अधिकृत फेसबुकमधील फेसबुक मित्रांना फ्रेन्डस रिक्वेस्ट पाठविल्या. त्यांना आर्थिक अडचणी सांगून गुगुल पे व फोन पे द्वारे पैसे पाठविण्यासाठी विनंती करीत असल्याची धक्कादायक बाब सायबर सेलच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली.
फसवणूक होताच वा शंका येताच १०० डायल करानागरिकांनी सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये, तरीही अशी फसवणूक झाली वा होण्याची शंका येताच पोलीस नियंत्रण कक्षाला १०० या क्रमांकावर कॉल करून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
खोट्या शापिंग वेबसाईटही गुन्हेगारांचा अड्डालॉकडाऊनच्या काळात आनलाईन खरेदीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जास्तीत जास्त लोकांनी विविध प्रकारचे पेमेंट आनलाईन करण्यावर भर दिला. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार खोट्या शॉपिंग वेबसाईट तयार करण्यावर भर देत आहे. लॉकडाऊनच्या काळात नोकरी गमावलेल्या व्यक्तींना सरकारकडून भत्ता मिळेल, अशी आमिषे दाखविली जात आहे.