लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : सिलिंडर गळतीमुळे गायत्री गुरुदेव नाकतोडे यांचे घर जळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चिखलगाव येथे घडली. या घटनेत एक लाखाचे संसारोपयोगी साहित्य खाक झाले.गायत्री नाकतोडे यांना उज्वला गॅस योजनेतंर्गत सिलिंडर मिळाला होता. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्वयंपाक करताना आगीचा भडगा उडाला. गावकऱ्यांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती गॅस वितरण कंपनी, पोलीस ठाणे व ब्रह्मपुरी नगर परिषद अग्निशमन दलाला देताच सर्वजण घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी नुकसानीचा पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.
सिलिंडरचा भडका, घर जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:26 PM