शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
3
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
4
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
5
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
6
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
7
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
8
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
9
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
10
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
11
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
12
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
13
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
14
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
15
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
16
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
17
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
18
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
20
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

गुप्ता एनर्जी प्लान्टच्या व्यवस्थापकाची दबंगगिरी

By admin | Published: September 12, 2016 12:46 AM

नजीकच्या उसगाव रस्त्यावरील गुप्ता एनर्जी कारखान्याचे व्यवस्थापक व त्यांच्या मुलाकडून कामगाराला सुरक्षा साधनाची सोय उपलब्ध करून न देता काम करण्यास बाध्य करीत आहेत.

कामगारांत रोष : व्यवस्थापकाच्या मुलाचाही दबावघुग्घुस : नजीकच्या उसगाव रस्त्यावरील गुप्ता एनर्जी कारखान्याचे व्यवस्थापक व त्यांच्या मुलाकडून कामगाराला सुरक्षा साधनाची सोय उपलब्ध करून न देता काम करण्यास बाध्य करीत आहेत. मराठी भाषिक कामगारांवर दबंगशाही करून अपशब्दाचा वापर केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी असाच वाद झाल्याने कामगार पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. ठाणेदाराने दोन्ही उभय पक्षात समेट घडवून आणल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.घुग्घुस-चंद्रपूर-ऊसगाव रस्त्यावर गुप्ता एनर्जीचा वीज प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाकरिता उसगाव, पांढरकवडा, शेणगाव, घुग्घुस परिसरातील उपजाऊ शेतजमिनी घेण्यात आल्या. प्रकल्पग्रस्तांना उशीरा का होईना नोकऱ्या दिल्या. मात्र अल्पावधीत कारखान्याचे उत्पादन बंद पडले. या कारखान्यातील ठेकेदारी कामगार बेरोजगार झाले. सुमारे शंभर प्रकल्पग्रस्त कामगारांना महिन्यातून १५-२० दिवस काम देण्यात येत असले तरी त्यांना तीन-तीन महिन्यानंतर वेतन देण्यात येते. प्रकल्पग्रस्तांची स्थिती शेती आणि रोजगारही गेल्यासारखी झाली आहे. या कारखान्यात कामगारांना सुरक्षा साधनाची सोय पुरेशी उपलब्ध होत नसल्याने जीव मुठीत घेवून काम करावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी गवत कापण्याच्या कामावर कामगारांनी गमबूटची मागणी केली आणि वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला गेला. कामगार पोलीस ठाण्यात पोहचले. मात्र ठाणेदारांनी दोन्ही उभय पक्षात समेट घडवून आणल्याने पुढील प्रकार टळला. असे असले तरी बापलेकाच्या दबंगगिरीवर कामगारांत रोष पसरला आहे. (वार्ताहर)नेहमी अपशब्दाचा वापर महाव्यवस्थापक शिवप्रसाद व त्याचा मुलगा डेक्स आॅपरेटर म्हणून काम करीत आहे. या बापलेकाकडून कारखान्यात काम करणाऱ्या मराठी भाषिक कामगारांचे शोषण सुरू आहे. महाराष्ट्रीयन या शब्दाचा वारंवार उपयोग करून अपमानित केले जात असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.