मागील एक आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात घराजवळ डुकरे मृत झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. तेव्हा एकट्या वडगाव प्रभागात आठवड्याभरात ३५ ते ४० डुकरे मृत झाल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर मनपाच्या तीनही झोनमधून माहिती घेतली असता सुमारे १०० डुकरांचा एका आठवड्यात मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. एका आठवड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर डुकरांचा मृत्यू होणे सामान्य बाब नाही. डुकरे मारण्यासाठी विषारी औषध देणे किंवा डुकरांमध्ये साथीचा आजार असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता डुकरांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मृत्यूच्या कारणांची तज्ज्ञ पशुवैद्यकीय वैद्यकीय चिकित्सक यांच्याकडून शहानिशा करावी, अशी मागणी नगरसेवक देशमुख यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते व उपायुक्त विशाल वाघ यांना पत्र देऊन केली आहे.
बाॅक्स
डुकरांचा मृत्यू नैसर्गिक असल्याची शक्यता आहे. एकाच दिवशी मृत्यू झाला नसून काही दिवसांच्या अंतराने झाला आहे. यासंदर्भात तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येणार असून लवकरच त्याचे कारण कळेल.
- संतोष गर्गेलवार
स्वच्छता अधिकारी, महापालिका चंद्रपूर.