सिंदेवाही : तालुक्यातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या गुंजेवाही गावाला नळाद्वारे दररोज दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
मागील सहा महिन्यांपासून फिल्टर प्लान बंद अवस्थेत आहे. गावाला असोलामेंढा तलावाचे पाणी पुरविले जाते; पण काही महिन्यांपासून दूषित पाणी प्यायला मिळत आहे. गावाचे सरपंच वसंत टेकाम यांनी पाणी पुरवठा विभाग सिंदेवाही यांच्याकडे तोंडी तक्रार देऊनसुद्धा ते पाहणीकरिता आले नाहीत. याकडे पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष आहे. नागरिकांच्या आरोग्याशी काही देणे-घेणे नाही, असे दिसते. नागरिकांचे आरोग्य बिघडल्यास संपूर्ण दोष हा या विभागाचा राहील. गुंजेवाहीला ४०० नळाचे कनेक्शन आहेत. गावाची लोकसंख्या पाच हजार आहे. विभागाने त्वरित कंत्राटदाराला पाठवून या समस्या सोडवाव्या, अशी नागरिकांची मागणी आहे.