शंकरपूर-भिसी-चिमूर मासळ हायब्रीड रस्त्याचे दोन वर्षांपासून बांधकाम सुरू आहे. भिसी-जामगाव दरम्यान शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी मोबदल्याशिवाय रस्ता बांधकामासाठी देणार नाही, असे असा इशारा देऊन विरोध केला. शेतकरी व प्रशासनाचे मतभेद झाले. शेवटी शेतकऱ्यांनी शासनाने जमीन मोजावी आणि त्यानंतरच बांधकाम सुरू करावा, असा पवित्रा घेतला. तहसीलदार, बांधकाम विभाग मुख्य अभियंता, कंत्राटदार, भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्त असतानाही काम करता आले नाही. अधिकारी परत गेल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींना निवेदन देऊन बांधकाम थांबविण्याची मागणी केली. काही महिने काम बंद होते. मात्र कोरोना लॉकडाऊन काळात कंत्राटदाराने रस्त्याचे बांधकाम केले. शेतात तीन ठिकाणी मोठे सिमेंट पाईप टाकले. त्यामुळे शेती खराब झाली, असा आरोप वामन तुंबेकर यांनी केला आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता शेतकऱ्यांनी रस्ता बांधकाम करताना कडेला नाली खोदकाम करू दिले असते तर शेतात माती व गाळ गेली नसती, अशी माहिती दिली.
पाईप टाकल्याने शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:20 AM