शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

ध्वनी प्रदूषणही डेंजर लेव्हलवर !

By admin | Published: June 09, 2017 12:50 AM

गीत, संगीताची गोष्ट निघाली की आवाजाच्या सुमधूरतेची चर्चा रंगते. आवाजात मधुरता असली तर जगही जिंकता येते, असे म्हटले जाते.

नियमांचे पालन ध्वनी प्रदूषणाबाबतही नाहीरवी जवळे । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गीत, संगीताची गोष्ट निघाली की आवाजाच्या सुमधूरतेची चर्चा रंगते. आवाजात मधुरता असली तर जगही जिंकता येते, असे म्हटले जाते. मात्र हाच आवाज मर्यादा ओलांडतो, कानठळ्या बसवितो, तेव्हा ह्दयाची स्पंदने वाढतात. जल, वायू प्रदूषणाने काळंवडलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात किमान ध्वनी प्रदूषण तरी नसावे; पण हाय...येथेही जिल्हावासीयांचे दुर्र्दैवच. जल आणि वायू प्रदूषणाने आरोग्याचे धिंडवडे उडत असतानाच आता ध्वनी प्रदूषणही यात हातभारच लावत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात औद्योगिक क्रांती झाली. महाऔष्णिक वीज केंद्र, सिमेंट कंपन्या, वेकोलिच्या कोळसा खाणी, पेपर मील, एमईएल प्लांट, पॉवर प्लांट यासह अनेक छोटेमोठे उद्योग जिल्ह्यात आहेत. आजघडीला ७५० उद्योग जिल्ह्याच्या भूमीत दिमाखाने उभे आहेत. या उद्योगात शेकडो मशनरीज, हजारो वाहने, जमिनीत खड्डा पाडणाऱ्या मशीन्स आहेत. या मशीनरीजचा आवाज नेहमी औद्योगिक परिसरात घुमत असतो. याशिवाय वेकोलि कोळसा खाण व सिमेंट कंपन्यातील वाहनांची वाहतूक २४ तास सुरू असते. ही वाहनांचा रात्रीही प्रवास सुरू राहत असल्याने वाहनांच्या मार्गावरील रहिवासी क्षेत्रात आवाजाचा त्रास जाणवतो. अनेकदा या वाहतुकीमुळे व त्यांच्या हार्नमुळे नागरिकांना झोप लागत नाही. रात्रीच्या वेळेत कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण होऊ नये, असे स्पष्ट कायद्याचे संकेत आहे. मात्र बोअरवेल खोदणाऱ्या मशीन्स नेहमी रात्रीच्या वेळेतच सुरू असतात. वेकोलिच्या कोळसा खाणीत मोठमोठे ब्लास्ट केले जाते. या ब्लास्टमुळे आजबाजुच्या घरांनाच भेगा पडतात, तेव्हा कानाचे आणि ह्दयाचे काय होत असेल, याचा विचार वेकोलिला तर सोडाच; प्रशासनालाही कधी शिवला नाही. ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० नुसार आवाजाबाबत अनेक नियम लागू करण्यात आले आहे. मात्र हे नियम कधी कुणी जाणून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. उलट ते पायदळी तुडविले जातात. आधीच जिल्हावासीयांचे जीवनमान जल व वायू प्रदूषणाने कमी करून टाकले आहे. आता ध्वनी प्रदूषण जिल्ह्यात गंभीर होऊ पाहत आहे. कायदा आहे हेच माहीत नाहीवाद्य वाजविण्याला कुणाचीही बंदी नाही. मात्र त्यासाठी आवाजाच्या मर्यादा आहेत. कायदाही आहे. मात्र कायदा पाळताना कुणीच दिसत नाही. किंबहुना ध्वनीचेही प्रदूषण असते आणि त्यासाठीही कायदा अस्तित्वात आहे, हेदेखील अनेकांना माहीत नाही. एरवी एखादा कायदा तोडला जाऊ नये म्हणून दक्षतेने काम करणारे पोलीस अधिकारी आणि शासकीय यंत्रणा आवाजाच्या या कायद्याबाबत गंभीर दिसत नाही. ध्वनी प्रदुषणाच्या विरोधात कायदा आहे, हे जरा इतरांनाही कळू देण्याची वेळ निश्चितच आली आहे. प्रवासी वाहनांचाही कर्णकर्कश आवाजशासनाकडे नोकऱ्या नाहीत. बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काय रोजगार करावा, हे तरुणांना सुचेनासे होत आहे. अशावेळी ट्रॅक्स, सुमोसारखी वाहने घेऊन त्याचा प्रवासी वाहने म्हणून वापर केला जात आहे. परिणामी प्रवासी वाहने गावागावात सुमार झालेली दिसून येत आहेत. ही वाहने ध्वनी प्रदूषणाबाबत असलेल्या कोणत्याच नियमांचे पालन करीत नाही. प्रवाशांना माहित व्हावे, यासाठी या वाहनांचे हार्नही मोठ्या आवाजाचे असतात.डीजेचा तर फक्त धिंगाणासध्या जमाना डीजेचा आहे. कमी आवाजात कुणाचे भागतच नाही. विशेष म्हणजे, हे डिजे १२५ डेसीबल आवाजाचे असतात. असे असले तरी या डीजेला ५० ते ५५ डेसीबल आवाजाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. मात्र याचे भान डीजे वाजविणाऱ्याला आणि डीजेच्या तालावर नाचणाऱ्याला नसते. गणपती-देवीच्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत सिमीत असलेला हा प्रकार आता चक्क लग्नापर्यंत पोहचला आहे.कानठळ्या बसतील एवढ्या आवाजात डिजे वाजवून तासाप्रमाणे पैसा वसूल करण्याच्या आसुरी वृत्तीपायी ही अतिउत्साही मंडळी इतरांच्या जीवावर उठली आहे.