लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात कपासीचे लागवड क्षेत्र वाढले. मात्र, यंदा हंगामपूर्व लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी. शिफारस केलेल्या कमी कालावधीच्या पक्व होणाºया बीटी कापूस अथवा सरळ वाणांची जून महिन्यात जमिनीत पूरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.जिल्ह्यात दोन वर्षांपासून कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात आली. मागीलवर्षी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रासह कृषी क्षेत्रातील यंत्रणांच्या सहकार्याने २०१८-१९ मध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यात काही प्रमाणात यश आले होते. यंदाच्या खरीप हंगामात कापूस पिकांवरील गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम वाढू नये, याकरिता शेतकºयांनी उपाययोजना करावी तसेच अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याबाबत कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. शेवटच्या वेचणीनंतर शेतातील पºहाटीचे रोटाव्हेटर यंत्राद्वारे लहान तुकडे करून शेतात गाडगे किंवा शेताबाहेर कंपोस्ट खड्ड्यात टाकावेत. शेतातील पालापाचोळा जमा करून संपूर्ण शेत व बांध स्वच्छ करणे अत्यावश्यक आहे. एप्रिल-मे महिन्यात जमिनीची खोल नांगरणी करावी. त्यामुळे किडीचे जमिनीतील कोष वर येतात. मुख्य म्हणजे जप्त उन्हामुळे हे कोष नष्ट होतील अथवा पक्षी त्यांना टिपून खाऊ शकतात.गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणाची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची व एकाच वेळी लागवड केली पाहिजे. लागवडीपासून काढणीपर्यंत दर आठवड्याला कीड व पिकांच्या अवस्थेचे सुक्ष्म अवलोकन केल्याने किडीच्या प्रादुर्भावाची तीव्रता पाहून आर्थिक नुकसानाची पातळी गाठल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. कीटकनाशके एकत्र मिसळून फवारणी वा अधिक मात्रेत फवारणी घातक ठरू शकते. ती टाळावी. बियाणे निवडताना कृषी विभागाने जाहीर केलेल्या निकषांचाच प्रामुख्याने विचार करावा. अन्यथा पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते, अशी माहिती कृषी विभागाने दिली.कीडीच्या प्रादुर्भावासाठी करा पीक फे रपालटकीडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्मितीसाठी पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर्षी कपाशी घेतलेल्या शेतात या हंगामात कापूस लागवड करू नये. पूर्वी तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य लागवड केलेली जमीन कापूस लागवडीसाठी निवडावी, या हंगामात कपाशीच्या सभोवती नॉन बीटी (आश्रित पीक) कपाशीची लागवड करावी. कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांच्या संवर्धनासाठी मका, चवळी, उडीद, मूग, झेंडू व एरंडी पिकांची एक ओळ लावल्यास गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.मित्रकिडींच्या संरक्षणासाठी...पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या तीन महिन्यांपर्यंत कीटकनाशकाचा वापर टाळावा. जेणेकरुन मित्र किडीचे संरक्षण होईल. या काळात वनस्पजीजन्य कीटकनाशके, जैव कीटकनाशके व मित्र किडीचा वापर करावा. युरियाचा वापर कदापि करून नये. जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता माती परिक्षण करून त्याच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब केला पाहिजे. पिकांच्या ५४ दिवसांत फेरोमन ट्रॅप्सचा वापर प्रति हेक्टरी पाच याप्रमाणे करावा. पिकातील बदलांचे दररोज निरीक्षण करून नोंद घेतली पाहिजे.
हंगामपूर्व कपाशी लागवड धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:18 PM
मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात कपासीचे लागवड क्षेत्र वाढले. मात्र, यंदा हंगामपूर्व लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी.
ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा सल्ला : शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी