शौचालयाचे उद्घाटन : सीईओंनी केली गावाची पाहणीवरोरा : पंचायत समिती अंतर्गत वंदली या गावात ‘एक दिवस मजुरांसोबत’ हा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘माझ गावच माझ तीर्थ’ ही संकल्पना मांडली. गावकऱ्यांना गाव विकास विषयी विविध उदाहरणे देवून मार्गदर्शन केले. यावेळी या कार्यक्रमात मजुरांना सिंह यांच्या हस्ते जाबकार्डचे वाटप करण्यात आले. जागतिक वृद्ध दिनाचे औचित्य साधून २५ वृद्धांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात शाश्वत स्वच्छता राखल्या जावी म्हणून राष्ट्रसंत यांच्या उक्तीनुसार ‘माझ गाव माझं तीर्थ’ या ब्रिदवाक्यासह वरोरा तालुक्याचा स्वच्छ भारत मिशन विषयक लोगोचे अनावरण मुख्य कार्यकारी अधिकरी सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. वरोरा तालुक्यात ‘माझ गावच माझ तीर्थ’, हे ब्रिद घेवून स्वच्छ भारत मिशनचा प्रचार प्रसिद्धीचे काम गावागावात करण्यात येणार आहे. यावेळी पोंभुर्णा गावात भेट देवून शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पं.स. सभापती सुनंदा जिवतोडे, गट विकास अधिकारी ओमप्रकार यादव, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बोदेले, जि.प. सदस्य विजय देवतळे, विविध विभागाचे विभागप्रमुख व मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वंधलीत एक दिवस मजुरासोबत
By admin | Published: October 09, 2016 1:35 AM