लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पाच याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. यामध्ये ५८ हजार ६४७ शेतकऱ्यांपैकी ५५ हजार ३०० लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश आहे. यातील ५३ हजार २०९ शेकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केले आहे. तर ४१ हजार ७०३ शेतकऱ्यांच्या खात्यात २६२.१९ कोटी रुपये खात्यात जमा करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली. त्यानुसार सदर योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांची पाचवी यादी शासनाने पोर्टलवर प्रसिध्द केली आहे. यामध्ये ५५ हजार ३०० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांपैकी ज्यांनी आधार प्रामाणीकरण केले आहे. त्यानाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार ४१ हजार ७०३ जणांना या योजनेचा लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात २६२.१९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना खरीप हंगामासाठी मदत मिळाली आहे. तसेच प्रामाणिकरणाचा पात्र शेतकºयांना लाभ मिळणार आहे.बँकेनुसार आधार प्रमाणिकरणपात्र लाभार्थ्यांपैकी आधार प्रमाणीकरण करणाºया शेतकºयांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ ५३ हजार २०९ लाभार्थ्यांंनी नोंदणी केली आहे. यामध्ये अलाहाबाद बँक ६, आंध्रा बँक १, बँक ऑफ इंडिया १६२, बँक आॅफ महाराष्ट्र १०२, कॅनरा बँक सात, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक १८७६, एचडीएफसी ६, आयडीबीआय १९, इंडियन बँक ५, स्टेट बँक आॅफ इंडिया १५९, विदर्भ कोकण ग्रामीण बँक १७७ इतक्या खातेदारांचा समावेश आहे.सदर योजनेंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनी नवीन पीक घेण्यासाठी संबंधित गटसचिव, संबंधित बँक शाखेशी आवश्यक त्या कागदपत्रासह संपर्क साधावा.- ज्ञानेश्वर खाडे,जिल्हा उपनिबंधक, चंद्रपूरवारसाची नोंद कर्जखात्यास कराकर्जमुक्तीच्या यादीत मृत खातेदाराचे नाव असल्यास मयत खातेदाराच्या नातेवाईक अथवा कायदेशीर वारसाने आधार प्रमाणीकरण न करता प्रथम कायदेशीर वारसाने त्याची संपूर्ण माहिती संबंधित बँक शाखेस पुरवावी. बँकेच्या नियमाप्रमाणे वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करून वारसाची नोंद कर्जखात्यास करून घ्यावी. वारसाच्या नोंदीची माहिती बँक १४ ऑगस्ट या कालावधीत पोर्टलवर भरू शकणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली.
४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 5:00 AM
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली. त्यानुसार सदर योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांची पाचवी यादी शासनाने पोर्टलवर प्रसिध्द केली आहे. यामध्ये ५५ हजार ३०० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांपैकी ज्यांनी आधार प्रामाणीकरण केले आहे. त्यानाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ठळक मुद्दे२६२.१९ कोटी खात्यात जमा । महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना