कार्यक्रमाला खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते. यापूर्वी जिल्हा खनिज विकास निधीमधून अद्ययावत अशा वीस मोठ्या रुग्णवाहिका पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या होत्या तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत पंधरा रुग्णवाहिका प्रस्तावित आहेत. या रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी हलविणे सोयीचे होणार आहे. या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळून त्यांचा जीव वाचविण्यास मदत होईल.
कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त जिल्हा आयूष अधिकारी डॉ. गजानन राऊत यांनी केले. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.