- राजेश मडावी चंद्रपूर : जन्मापासून सहाव्या वर्षांपर्यंत शारीरिक, मानसिक व बौद्धीक वाढ मंदावलेल्या जिल्ह्यातील १२६ बालकांवर जिल्हा सामान्य रूग्णालयातील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात बालआरोग्य तज्ज्ञांकडून प्रभावी उपचार झाल्यामुळे त्यांचे जीवन फुलले.ही बालके ज्ञान ग्रहण करण्यास मानसिकदृष्ट्या तयार झाली.पहिल्या तीन वर्षांत तातडीने निदान व उपचार झाले नाही तर बालकांच्या ज्ञानग्रहण करण्याच्या नैसर्गिक क्षमता मंदावतात. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हे उपचार केले जातात. बालकांना सेवा पुरविण्यासाठी राज्य सरकारने १२६ प्रकारची साधने चंद्रपुरातील केंद्राला उपलब्ध करून दिली आहेत.>बांधकामासाठी परिसरातच जागा प्रस्तावित‘डीईआयसी’मध्ये सर्व आरोग्यसेवा एकाच छताखाली पुरविल्या जातात. नर्सिंग स्कूलमध्ये हे केंद्र सध्या तात्पुरत्या स्वरूपात सुरू आहे. बांधकामासाठी परिसरामध्येच जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने लवकरच बांधकाम होणार आहे, अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड यांनी दिली.
‘डीईआयसी’ने फुलविले १२६ दिव्यांग बालकांचे जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 3:38 AM