याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी तातडीची आढावा बैठक नगर परिषद सभागृह, भद्रावती येथे आयोजित केली. शहरातील फुलेनगर सुमठाणा येथील ४० वर्षीय महिलेला एका महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. या महिलेचे रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तब्बल एक महिन्यानंतर रक्ताचा अहवाल डेल्टा प्लस आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या महिलेची प्रकृती ठणठणीत आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नगर परिषद सभागृह, भद्रावती येथे तातडीची बैठक बोलावली. यावेळी उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार महेश शितोळे, मनीष सिंग, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर उपस्थित होते.
या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असली तरी या परिसरात कॅम्प लावून नागरिकांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे गरज असल्याचे डॉक्टर मनीष सिंग यांनी ‘लोकमत’ला सांगितले. डेल्टा प्लसचा रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.