लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण विकास कार्यक्रम, सामाजिक सामूहिक सेवा, पाटबंधारे, पाणीपुरवठा यासह आयटीआय, प्राथमिक शाळा, दवाखाने, अंगणवाडी यांचे बांधकाम व दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी शनिवारी ३२७ कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी जिल्हा वार्षिक योजनेसाठी केली. तर जिल्ह्यासाठी नवा पशुवैद्यकीय आराखडा तयार करण्याची सूचना या बैठकीत करण्यात आली.नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० सर्वसाधारण योजनेचा आढावा घेण्यात आला. राज्याचे वित्त, नियोजन वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.या बैठकीला वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, आ. नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मनपा आयुक्त संजय काकडे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुरुस्ती आणि विस्तारीकरण याबाबत यावेळी ना. मुनगंटीवार यांनी सूचना केल्यात. या बैठकीला आवर्जून उपस्थित असणारे ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्ष महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्याच्या विस्तारीकरणामध्ये येणाऱ्या वीज खांब हटविण्यासंदर्भातही चर्चा झाली.या घटकांवर झाली चर्चाबैठकीमध्ये जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना, कोल्हापुरी बंधारे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम, अंगणवाड्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या वर्कशॉप, प्रशासकीय इमारतीसाठी नवीन जमीन संपादन, बांधकाम करणे, नागरी वस्तीचा विकास, नागरिकांच्या आरोग्याशी निगडित पायाभूत सुविधांचा विकास, घनकचरा व्यवस्थापन या घटकांवर प्रामुख्याने चर्चा झाली.यापूर्वीच ३४७ कोटींच्या आराखड्याला मंजुरीयापूर्वी १३ डिसेंबर रोजी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याच्या बैठकीमध्ये तीनही घटक योजनांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा २०१९-२० या वर्षाकरिता ३४७ कोटीच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी मिळाली होती. आता अतिरिक्त मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती योजना, चांदा ते बांदा, आदी घटकांची उपलब्धता आहे. आज जिल्हा वार्षिक आराखडा यांच्या सर्वसाधारण घटकातील अतिरिक्त मागणीवर विचार झाला.
जिल्ह्यासाठी अतिरिक्त ३२७ कोटींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 10:25 PM
ग्रामीण विकास कार्यक्रम, सामाजिक सामूहिक सेवा, पाटबंधारे, पाणीपुरवठा यासह आयटीआय, प्राथमिक शाळा, दवाखाने, अंगणवाडी यांचे बांधकाम व दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी शनिवारी ३२७ कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी जिल्हा वार्षिक योजनेसाठी केली. तर जिल्ह्यासाठी नवा पशुवैद्यकीय आराखडा तयार करण्याची सूचना या बैठकीत करण्यात आली.
ठळक मुद्देअर्थमंत्र्यांकडून सकारात्मक संकेत : नागपुरातील राज्यस्तरीय बैठक