कष्टकरी व गरीब रुग्णांना खासगी डॉक्टरांचा खर्च परवडणारा नसल्याने गरीब रुग्णांना वेदना सहन करीत घरीच पडून राहावे लागत आहे. पैशाअभावी वेळेवर उपचार घेता न आल्यामुळे दंत रुग्णांना वेगवेगळ्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात दातांचे डॉक्टर असून, या रुग्णालयातदेखील दात आजारावर उपचार करण्यासाठी पाहिजे तशी सुविधा रुग्णांना मिळत नाही. अनेक ग्रामीण रुग्णालयात दातांच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा आभाव असल्यामुळे या रुग्णालयात दातांचे डॉक्टर असताना देखील त्यांना रुग्णावर योग्य उपचार करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दातांच्या डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.