गवराळा - घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने अडचण जाते.
पुलावर कठड्याअभावी अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना - गोविंदपूर - आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
जुन्या वाहनांची तपासणी करा
ब्रह्मपुरी : शहरात कोळसा खाणी तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने प्रदूषण वाढले आहे.
ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर
जिवती : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नाही.
दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : कोरपना येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून, अधिकारी व कर्मचारीही नाही. त्यामुळे नागरिकांना राजुरा येथे जाऊन आपली कामे करावी लागत आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
नेटपॅकचे दर कमी करण्याची मागणी
चंद्रपूर : शाळा, महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना नेट पॅक मारावा लागत आहे. साधारणत: अडीचशेच्या जवळपास खर्च येत आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात नेटपॅक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालक करीत आहेत.
तारसा येथील नाल्यांचा उपसा करा
वढोली : गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुज येथील वॉर्ड नं. २सह इतर वाॅर्डामधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या उपसा न केल्याने तुडुंब भरलेल्या आहेत.