घुग्घुस : घुग्घुस नगर परिषद क्षेत्र अंतर्गत गावातील नागरिकांची गाव नमुना ८ (अ) वर नोंदणी आहे. त्यांना मालमत्ता विक्रीसाठी घुग्घुस नगर परिषदेने प्रमाणपत्र द्यावे तसेच ज्यांची मालमत्ता गावठाण येथे आहे त्यांनासुद्धा आपली मालमत्ता विक्रीसाठी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुस नगर परिषद मुख्याधिकारी अर्शिया जुही यांना निवेदनातून केली आहे.
घुग्घुस हे औद्योगिक शहर असून ५० हजारांच्या घरात लोकसंख्या आहे. नगर परिषद हद्दीतील अनेक नागरिकांची मालमत्ता गाव नमुना ८ (अ) वर नोंदणी आहे. गावठाण आहे परंतु प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना आपली मालमत्ता विक्रीसाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे, याकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे. यावेळी माजी जि.प. सभापती नितू चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सुचिता लुटे, साजन गोहणे, अनंता बाहादे, निरंजन डंभारे, राजेंद्र लुटे, मंगेश पचारे, असगर खान, सतीश कामतवार, निरंजन नगराळे, सुनंदा लिहीतकर उपस्थित होते.